Friday, May 16, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पाकिस्तानी हिंदूमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने मोठी घोषणा करताना स्पष्ट केले आहे की पाकिस्तानी हिंदूचा व्हिसा रद्द होणार नाही.


पाकिस्तानी हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे लोग जे भारतात राहत आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही. हे पाऊल मानवजातीला अनुसरून उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे हिंदू शरणार्थींची चिंता संपली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की ज्या पाकिस्तानी हिंदूंना लाँग टर्म व्हिसा जारी करण्यात आला आहे त्यांना परत जावे लागणार नाही. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने हिंदू पलायन करून भारतात आले आहेत आणि येथील नागरिकतासाठी अर्ज करत आहेत. एका रिपोर्टनुसार, हजारो पाकिस्तानी हिंदू शरणार्थी विविध भारतीय शहरांमध्ये राहत आहेत.



दिल्लीपासून ते गुजरातपर्यंत हिंदू शरणार्थी


राजस्थानच्या जोधपूर, जैसलमेर, बाडमेर आणि बिकानेर सारख्या जिल्ह्यांमध्ये हिंदू शरणार्थींची संख्या मोठी आहे. जोधपूरमध्ये तर अनेक बेकायदेशीर कॉलनीज बनवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील मजनू का टीला आणि आदर्शनगर या भागांमध्ये पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहे. दरम्यान, यातील काही शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. गुजरातच्या कच्छ आणि अहमदाबादमध्येही पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहेत. जम्मू शहरात साधारण २६ हजार ३१९ पाकिस्तानी हिंदू शरणार्थींची कुटुंबे आहेत.

Comments
Add Comment