अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. देशात असलेले पाकिस्तानी नागरिक ओळखून त्यांना परत पाठवा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
पहलगाम (जम्मू-कश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, अधिकृत कागदपत्र असलेल्यांना १ मे पर्यंत आणि सार्क व्हिसाधारकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत.
वक्फ कायद्यात बदल गरजेचाच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सूचित करत राज्यातील पाक नागरिकांची यादी तयार करून तात्काळ परत पाठवण्याच्या सूचना दिल्या.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्येही या कारवाईचे पडसाद दिसू लागले. येथे ३४ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी शहनाज बेगम ही एक महिला विशेष व्हिसावर भारतात आल्या आहेत. पण आता त्या ४८ तासांत भारत सोडणार आहेत.
गृहमंत्रालयाच्या या आदेशानंतर देशभरात पाकिस्तानी नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत.