Wednesday, May 21, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन कुणाल कामरा याची मुंबई पोलीस चौकशी करू शकतात. पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत कुणालला अटकेपासून संरक्षण देण्यात येत आहे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्देशांमुळे कुणाल कामरावरील अटकेची टांगती तलवार सध्या दूर झाल्याचे चित्र आहे. न्यायालयाकडून कुणाल कामराला हा दिलासा मिळाला आहे.



स्टँड-अप कॉमेडी शो करताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची कुणाल कामराची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. न्यायमूर्ती एम. मोडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. कुणाल कामरा प्रकरणाशी संबंधित सुनावणी सुरू राहणार आहे.



कुणाल कामरा सध्या चेन्नईच्या घरी वास्तव्यास आहे. यामुळे पोलिसांना चौकशी करायची असेल तर चेन्नईत जाऊन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करावी लागणार आहे.
Comments
Add Comment