Friday, May 16, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्या पर्यटकांना ठार करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा पथकाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीआधारे तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. या तीन अतिरेक्यांना सुरक्षा पथके शोधत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी तिन्ही अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करुन माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती सुरक्षा पथकांना मिळाली. यानंतर सुरक्षा पथकांनी तातडीने कारवाई केली.







जरी तीन रेखाचित्रे प्रसिद्ध केली असली तरी आणखी काही अतिरेकी स्थानिक मदतनीस म्हणून सहभागी झाले होते. यात त्राल येथील आसिफ शेख हा एक अतिरेकी होता.

सुरक्षा पथकांना आदिल आणि आसिफ शेख या दोघांची घरे जम्मू काश्मीरमध्येच असल्याचे कळले. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकांनी या घरांवर धाड टाकली. एका अतिरेक्याच्या घरात आयईडी आढळला. यानंतर बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने आयईडी न हलवता तिथेच स्फोट करुन नष्ट करणे हाच पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले. यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन स्फोट करण्यात आला. अतिरेक्याचे घर आयईडी स्फोटात नष्ट झाले. यानंतर दुसऱ्या अतिरेक्याच्या घरावर बुलडोझर फिरवून ते घर पाडण्यात आले. दोन्ही घरे नष्ट झाली आहेत. पण अद्याप अतिरेकी सापडलेले नाहीत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.



आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. यातील आदिलचे बिजबेहारातील गुरी येथील घर बुलडोझरने पाडण्यात आले. तसेच अतिरेकी आसिफ शेखचे घर स्फोटकांनी नष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment