Friday, April 25, 2025
HomeदेशNeeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम

बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी क्लासिक (NC Classic) भालाफेक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राने सोमवारी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आमंत्रण दिले होते. पण मंगळवार २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्यांना ठार करण्यात आले. तब्बल २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. या घटनेने देशाला धक्का बसला. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू झाली आणि नीरज चोप्राचे सोमवारी दिलेले आमंत्रण वादाच्या भोवऱ्यात सापडले.

पाकिस्तानच्या भालाफेकपटूला भारतातील स्पर्धेसाठी विशेष आमंत्रण दिल्याबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका सुरू झाली. अखेर नीरजने ट्वीट करुन टीकाकारांची तोंड बंद केली.

मी मितभाषी आहे. पण चुकीचं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध बोलतो. माझ्या देशप्रेम आणि निष्ठेविषयी कोणी शंका उपस्थित करत असेल अथवा प्रश्न विचारत असेल तर मला बोलावंच लागेल. नाहक माझ्याविषयी अथवा माझ्या कुटुंबातील सदस्यांविषयी बदनामी करणारी वक्तव्य होत असतील तर ती खोडून काढावीच लागतील.

ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताकडून मी सहभागी झालो. आमच्या कामगिरीनंतर दोघांच्या आयांची एकमेकींशी भेट झाली, त्यावेळी अनेकांनी या क्षणांचे विशेष कौतुक केले. आज अर्शदला एका स्पर्धेसाठी भारतात आमंत्रित केले तर थेट माझ्या आणि माझ्या आईच्या देशप्रेमावरच शंका उपस्थित केली जात आहे. हे खूप जास्त होत आहे.

अर्शदला आमंत्रण दिले ते एक खेळाडू म्हणून. एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला अशा स्वरुपाचे हे आमंत्रण होते. हे आमंत्रण सोमवारी २१ एप्रिल रोजी दिले होते. जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा पहलगामची घटना घडली नव्हती. पण मंगळवारी पहलगाममध्ये जे घडले त्यानंतर अर्शद उपस्थित राहण्याचा प्रश्नच उरलेला नाही. देश, देशप्रेम, देशाविषयीची निष्ठा हे कधीही सर्वोच्चच असेल, असे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला.

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

मला विश्वास आहे की आपल्या देशाचा प्रतिसाद एक राष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवेल आणि न्याय मिळेल…” ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि न्याय मिळेल, असे नीरजने ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

त्याने पुढे लिहिलं, ‘मी अभिमानाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. जेंव्हा माझ्या देशप्रेमावर शंका उपस्थित होते, तेव्हा ती वेदना एकदम खोलवर पोहोचते. कोणत्याही योग्य कारणाशिवाय काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका करत आहेत. आम्ही साधे आणि शांत लोक आहोत. माझ्याविषयी काही माध्यमांनी बनवलेल्या खोट्या बातम्या मी खोडून काढत नाही, याचा अर्थ त्या सत्य आहेत, असं नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -