Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Metro : मेट्रो-३ फेज २ ए मार्ग लवकरच होणार सुरू!

Mumbai Metro : मेट्रो-३ फेज २ ए मार्ग लवकरच होणार सुरू!

मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज २ ए (metro 3-phase 2  A) या मार्गावरील अनेक स्थानकांचे फोटो आणि व्हिडीओदेखील समोर आले आहेत. आता लवकरच शहरातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील भूमिगत मेट्रो लाईन, ज्याला अॅक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते, लवकरच सुरू होणार आहे. ही सुविधा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते वरळी येथील आचार्य अत्रे चौकाला जोडणारी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनीही यास दुजोरा दिला. भिडे यांनी नमूद केले की, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) कडून मंजुरीची वाट पाहत आहे, जी पुढील दोन दिवसांत अपेक्षित आहे.

Shah Rukh Khan : पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत!

एकदा प्रमाणित झाल्यानंतर, मुंबई मेट्रो-३ (Mumbai metro 3) चा दुसरा टप्पा सुरु होईल. साधारण ६० किलोमीटरचा मेट्रो मार्ग आधीच कार्यरत असल्याने, मुंबईतील मेट्रो लवकरच मुंबई महानगर प्रदेशात ३७४ किलोमीटरपर्यंत वाढेल, असे त्या म्हणाल्या. सर्व नियोजित कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर, दररोज सुमारे एक कोटी प्रवाशांना याचा फायदा होईल. या मार्गाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी किंवा २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे उद्घाटन होऊ शकते अशी शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मेट्रो लाईन- ३ च्या पहिल्या टप्प्यात १० स्थानके आहेत. या मेट्रोच्या सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत दररोज ९६ फेऱ्या होतात.

आरे ते बीकेसी दरम्यानचा प्रवासाचा वेळ रस्त्याने एका तासापेक्षा जास्त असून, मेट्रोने तो फक्त ३० मिनिटांत पूर्ण होतो. या मार्गावरील तिकिटांचे दर १० ते ५० रुपयांच्या दरम्यान आहेत. फेज २ ए नंतर, फेज २ बी (वरळी ते कफ परेड) जुलै २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मेट्रो-३ लाईन पूर्ण झाल्यावर, ३३.५ किमी लांबीचा हा भूमिगत कॉरिडॉर सहा प्रमुख व्यवसाय केंद्रे, ३० प्रमुख कार्यालय क्षेत्रे, १२ शैक्षणिक संस्था, ११ रुग्णालये, १० प्रमुख वाहतूक बिंदू आणि २५ सांस्कृतिक आणि मनोरंजन स्थळांना जोडेल. यासह ही लाईन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल्सपर्यंत थेट प्रवेश प्रदान करेल. भूमिगत स्थानकांमध्ये मोबाइल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि एमटीएनएल यांच्या सहकार्याने अँटेना आणि रिपीटर्स बसवले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -