Kartik Aaryan Naagzilla Movie : फन फैलाने आ रहा हू... कार्तिक आर्यनचा नागराज अवतार!

'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : करण जोहरने (Karan Johar) नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. 'नागझिला' असे या चित्रपटाचे नाव असून यातून सापांच्या वेगळ्याच जगाचे चित्र प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून बॉलीवूडचा लाडका अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan Naagzilla Movie) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने देखील सोशल मीडियावर हटके कॅप्शनमध्ये व्हिडीओ शेार करत याची माहिती दिली आहे.



''इन्सानो वाली पिक्चरे तो बहुत देख ली, अब देखो नागों वाली पिक्चर. नाग लोक का पहला कांड....फन फैलाने आ रहा हू..'' असे कॅप्शन देत कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) पोस्ट शेअर केली आहे. तसेच हा चित्रपट पुढील वर्षी नागपंचमीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट २०२६ या तारखेला 'नागझिला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.






दरम्यान, कार्तिकने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. कमेंट्समध्ये एका युजरने पुढील वर्ष फक्त कार्तिकचं असेल, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने त्याला ऑल राऊंडर म्हटले आहे. बिगेस्ट ब्लॉकबस्टर लोडिंग असेही तिसऱ्या युजरने म्हटले आहे. असंख्य चाहत्यांनी त्याला फायर आणि हार्ट इमोजी शेअर करून त्याचे स्वागत केले आहे. येणाऱ्या चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा मिळताना दिसत आहे.



काय आहे चित्रपटाची कथा?


कार्तिक आर्यनच्या 'नागझिला' चित्रपटाचे शुटींग सप्टेंंबर महिन्यात सुरु होणार आहे. हा चित्रपट साप आणि माणसाच्या संघर्षावर आधारित विनोदी कथा असणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि महावीर जैन यांनी केली आहे.








Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट