उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शरीरात डिहायड्रेशन होण्याची भीती असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात थंडावा ठेवण्यासाठी अनेक पेय प्यायली जातात. गरमीमध्ये काही लोकांना बाहेर पडलं की सारखंच लिंबू पाणी किंवा इतर थंड पेय प्यावेसे वाटत असतात. तर काहींना उसाचा रस हा फार आवडीचा असतो. बाजारात उसाच्या रसाच्या गाड्या दिसू लागतात. उसाचा रस हे एक चविष्ट आणि किफायतशीर पेय आहे जे बाजारात सहज उपलब्ध आहे. उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही शिवाय यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला एनर्जीसुद्धा मिळते. उसाचा रस पिण्याचे शरीराला खूप फायदे होतात. या लेखातून जाणून घेऊया या फायद्यांबद्धल…
१. ऊर्जा मिळते
उसाचा रस प्यायल्याने शरीराला खूप ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे ही ऊर्जा अनेक तास टिकून राहते. उसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या रसात नैसर्गिक साखर देखील असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.
२. वजन कमी करण्यात मदत
वजन कमी करण्यातही उसाचा रस खूप फायदेशीर असतो. यात खूप फायबर असतं. या फायबरमुळं पोट खूप वेळ भरलेलं राहतं. इतर काही खावं वाटत नाही.
३. थकवा दूर होतो
उसाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाळ्यात थकवा जाणवत असेल तर हा रस प्यायल्याने थकवा सुरू होईल.
४. मधुमेहीसुद्धा पिऊ शकतात
मधुमेहीसुद्धा उसाचा रस पिऊ शकतात. या रसात आईसोमाल्टोज नावाचं एक तत्व असतं. यात ग्लायसेमिकचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं मधुमेहींना उसाच्या रसापासून धोका पोचत नाही.
Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!
५. रोगप्रतिकारशक्ती वाढते
उसाचा रस प्यायल्याने आपलं शरीर स्वतःला अनेक बॅक्टरियल आणि व्हायरल संसर्गांपासून वाचवू शकतं. सोबतच त्यामुळं रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
६. सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर होईल
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डाग, पांढरे चट्टे दूर करण्यासाठी उसाचा रस प्यायला पाहिजे. यात खूप प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतं.
(टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)