Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीप्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे

प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे

इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. भारताने पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याची धडपड सुरू केली आहे. गरज पडली तर सिमला करार मोडू अशी धमकी पाकिस्तानने दली आहे. यामुळे भारत – पाकिस्तान यांच्यात लढाई होण्याची शक्यता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची ताजी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे.

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय गंगाजळी आता फक्त १५.४३६ बिलियन डॉलर एवढीच उरली आहे. पाकिस्तानमध्ये ‘रोटी’ करण्यासाठीचा आटा (पीठ) भारताच्या तुलनेत दुपटीने महाग आहे. पाकिस्तानमध्ये पाच किलो आटा किमान ५६० रुपये दराने उपलब्ध आहे. सध्या पाकिस्तानमध्ये तांदूळ २७५ रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये चण्याची डाळ ५७५ रुपये किलो या दराने मिळत आहे. तसेच पाकिस्तानमध्ये साखर १८५ रुपये किलो आणि सफरचंद ५३० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी टोमॅटो ८१ रुपये किलो दराने मिळत आहे.

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

डिसेंबर २०२४ पर्यंत पाकिस्तानवरचे परकीय कर्ज १३१.१ बिलियन यूएस डॉलर वर पोहोचले. या कर्जाचा विचार करता प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. पाकिस्तानने चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून मोठे विदेशी कर्ज उचलले आहे. हे कमी म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ४.४ बिलियन यूएस डॉलरचे कर्ज घेतले आहे.

भरमसाठ कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानने हप्ते फेडणे पण कठीण झाले आहे. वारंवार विनंती करुन पाकिस्तानने २०२४ मध्ये चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून कर्जाच्या परतफेडीची मुदत एक वर्षाने वाढवून घेतली. हे करण्याच्या बदल्यात पाकिस्तानला अनेक अटी शर्तींचे पालन करण्याची तयारी दाखवावी लागली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -