Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीSaifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच इथे एक भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि पुन्हा एकदा काश्मीरचं वातावरण हादरलं. या हल्ल्याची जबाबदारी घेतली द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेनं. आणि लगेचच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला.. ही नवी संघटना नक्की कोणती? कुठून आली? आणि या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालीद नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊ या…

द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना काही अचानक उदयास आलेली नाही. तिचा थेट संबंध लष्कर-ए-तोयबासोबत आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ही संघटना सक्रिय झाली. आणि फार कमी वेळातच काश्मीरमध्ये आपली मुळे रोवली. या संघटनेनं लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांतील सक्रिय दहशतवाद्यांना एकत्र आणलं. पहेलगाममधील ताज्या हल्ल्याचंही नियोजन याच संघटनेनं केलं. हल्ल्याबाबत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे दहशतवादी थेट नियंत्रण रेषा पार करून २०० किलोमीटर आतपर्यंत कसे आले? आणि त्यांनी भारतीय लष्कराच्या पंचतारांकित सुरक्षाव्यवस्थेला भेदलं तरी कसं?

द रेझिस्टन्स फ्रंटनं यामागचं कारण दिलं आहे की, कलम ३७० नंतर भारत सरकारनं काश्मीरमध्ये बाहेरच्या ८५,००० नागरिकांना वसाहती दिल्या, जे आधी पर्यटक म्हणून आले, आणि आता तिथेच स्थायिक होत आहेत. पण हे कारण केवळ वरवरचं आहे. खरा उद्देश आहे काश्मीरमध्ये पुन्हा भीती आणि अशांतीचं वातावरण निर्माण करणं.

या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड आहे सैफुल्ला खालीद, ज्याला सैफुल्ला कसुरी असंही म्हणतात. आता पाहू हा सैफुल्ला खालीद आहे तरी कोण? तो लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ आहे आणि दहशतवादी हाफिज सईदचा अत्यंत जवळचा माणूस. पाकिस्तानमध्ये त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाते. काही महिन्यांपूर्वी त्याने पाकिस्तानातील पंजाबमधल्या कंगनपूरमध्ये भाषणात म्हटलं की, “जितके भारतीय सैनिक माराल, अल्लाह तितकं इनाम देईल.” त्याने अबोटाबादच्या जंगलात दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबीर घेतलं होतं. आणि पहेलगाम हल्ल्यासाठी कोण दहशतवादी सहभागी असतील याची निवडही त्यानेच केली होती.

Pahalgam Terror Attack : पुन्हा एकदा दहशतीचा अंधार!

द रेझिस्टन्स फ्रंटकडे हेड स्क्वॉड आणि फाल्कन स्क्वॉड सारखी खतरनाक मॉड्युल्स आहेत जे भविष्यात आणखी मोठे हल्ले करू शकतात. या घटनेनंतर भारतीय लष्करानं शोध मोहीम सुरू केलीय. ३-४ दहशतवाद्यांचे स्केचेस तयार करण्यात आलेत. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला अलर्टवर ठेवण्यात आलंय. तर तिकडं पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसफ म्हणाले की, “पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही.” पण लक्षात ठेवा – २६/११ हल्ल्यावेळीही पाकिस्तानने हाच दावा केला होता. त्यामुळे आता देशाचं लक्ष आहे… मोदी सरकार या हल्ल्याचं उत्तर कसं देणार? पुन्हा एकदा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक होणार का? हे पाहावं लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -