नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय आणि लष्करी घडामोडींकडे अनेकांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आयएनएस सूरत या विनाशिकेवरुन भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७० किमी. पर्यंतच्या लक्ष्याला अचूक हल्ला करुन नष्ट करण्यास सक्षम आहे.
#IndianNavy‘s latest indigenous guided missile destroyer #INSSurat successfully carried out a precision cooperative engagement of a sea skimming target marking another milestone in strengthening our defence capabilities.
Proud moment for #AatmaNirbharBharat!@SpokespersonMoD… pic.twitter.com/hhgJbWMw98
— SpokespersonNavy (@indiannavy) April 24, 2025
भारताने ज्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली ते स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र (indigenous guided missile) आहे. भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलासाठी हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.
पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय
अरबी समुद्रात आयएनएस विक्रांत
भारत – पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेची नियुक्ती अरबी समुद्रात करण्यात आली आहे. कोणतीही विमानवाहक नौका समुद्रात तैनात असते त्यावेळी त्या नौकेच्या भोवताली युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या यांचा ताफा असतो. या व्यवस्थेनुसार आयएनएस विक्रांत इतर लढाऊ नौकांचा ताफा अरबी समुद्रात नियुक्त करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर मिग २९ के लढाऊ विमानांचा ताफा आणि कामोव्ह ३१ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे. ही नौका २६२ मीटर लांब आणि ५९ मीटर रुंद आहे. आयएनएस विक्रांत एकावेळी किमान ४० लढाऊ विमानांचा ताफा स्वतःसोबत घेऊन फिरण्यास सक्षम आहे. शिवाय या नौकेवर किमान ६४ बराक क्षेपणास्त्र कोणत्याही वेळी तयार स्थितीत ठेवली जातात. ही नौका जगातील सर्वोत्तम दहा विमानवाहक नौकांपैकी एक आहे.