Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीRiteish Deshmukh : 'हा' कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं...

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट सुरु असताना एक धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी २२ एप्रिल रोजी घडली होती. मंगळवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास युनिटमधील एक ज्युनियर आर्टिस्टचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या चित्रपटाचे शूटिंग सध्या साताऱ्यातील संगम माहुली मंदिर परिसरात सुरू होते. शूटिंग संपल्यानंतर सिनेमातील काही आर्टिस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. पण एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली.तरुणाचे नाव सौरभ शर्मा असून तो या सिनेमात डान्स आर्टिस्ट म्हणून काम करत होता. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेला सौरभ राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे. याप्रकरणी चित्रपटाची निर्मिती संस्था मुंबई फिल्म कंपनीने निवेदनही जारी केलं आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

 

घटना काय घडली?

गाण्याच्या शुटींगमध्ये हळदीचा सीन असल्याने सर्वांच्या अंगावर, कपड्यांवर हळद लागली होती. म्हणून सगळेजण नदीवर पोहण्यासाठी, अंघोळीसाठी गेले होते तेव्हा नदीजवळ इतरही जण आंघोळ करत होते. मात्र पोहत असताना सौरभ अचानक नदीच्या मध्यभागी पोहोचला आणि त्या जागी तो बुडू लागला. ज्या ठिकाणी तो बुडाला त्या ठिकाणी मोठा भोवरा होता. नदीत त्या ठिकाणी एकूण ३ भोवरे आहेत. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सौरभचा शोध सुरू होता. त्याच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला असून रितेश देशमुखची टीम त्याच्या सतत संपर्कात आहे.

मुंबई फिल्म कंपनीने सौरभबद्धल घडलेल्या घटनेस दुजोरी दिली. तसेच या धक्कादायत घटनेनंतर रितेशनेही काही काळासाठी चित्रपटाचं शूटिंग थांबवलं आहे. या तरुणाला शोधण्याचं काम रेस्क्यू टीमकडून अद्याप सूरु आहे. दरम्यान या घटनेनंतर रितेश देशमुख आणि त्याच्या मुंबई फिल्म कंपनीने शूटिंगच काम थांबवलं आहे. तसेच रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीकडून सोशल मीडियावर निवेदनही जारी करण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -