Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीप्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा...

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर ‘फौजी’ ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध

Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या हल्ल्याविरुद्ध सर्वच क्षेत्रामधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास जोरदार विरोध देखील केला जात आहे. अलीकडेच, फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाला भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता, प्रभास स्टारर ‘फौजी’ ची अभिनेत्री इमानवी इस्माईललाही विरोध केला जात आहे. इमानवीच्या वडिलांचे पाकिस्तानी लष्कराशी संबंध असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र इमानवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या बातम्यांचे खंडण केले आहे.

दाक्षिणात्य सिने सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या सिनेमात झळकणारी अभिनेत्री इमानवी इस्माईलच्या कुटुंबाचा पाकिस्तानी सैन्याशी संपर्क असल्याच्या बातम्या वाऱ्याच्या वेगात पसरत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घातली जात असल्यामूळे, इमानवीला देखील भारतीय प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागत आहे. त्यामुळे, या संदर्भात इमानवीने इंस्टाग्रामवर एक लांब पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने माझा किंवा माझ्या कुटुंबाचा पाक सैन्याशी कोणताही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे.

इमानवीने पोस्ट शेअर करत मांडली बाजू 

 

View this post on Instagram

 

A post shared by Imanvi (@imanvi1013)

इमानवीने पोस्ट शेअर करत लिहिले की- “सर्वप्रथम, मी पहलगाममधील दुःखद घटनेबद्दल मनापासून शोक व्यक्त करू इच्छिते. ज्यांनी हल्ल्यात आपले प्राण गमावले आहेत, त्यांच्या नातेवाईकाला माझ्या संवेदना आहेत. कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा मृत्यू हा अत्यंत दुःखद आहे, आणि त्याचा माझ्या मनावर देखील खोलवर परिणाम होतो. मी हिंसक कृत्यांचा तीव्र निषेध करते”

इमानवी पुढे असे देखील म्हणाली कि, “मला माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल खोट्या बातम्या आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल बोलायचे आहे. पहिले म्हणजे, माझ्या कुटुंबातील कोणीही कधीही पाकिस्तानी सैन्याशी कोणत्याही प्रकारे जोडलेले नाही. हे ट्रोलर्सनी द्वेष पसरवण्याच्या एकमेव उद्देशाने खोट्या बातम्या पसरवल्या आहेत.”

“मी एक इंडो अमेरिकन मुलगी”: इमानवी

इमानवीने लिहिले “मी एक इंडो अमेरिकन मुलगी आहे, जी हिंदी, तेलुगू, गुजराती आणि इंग्रजी बोलते. माझे आईवडील लहानपणीच कायदेशीररित्या अमेरिकेत स्थलांतरित झाल्यानंतर माझा जन्म कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे झाला. लवकरच, ते अमेरिकन नागरिक देखील झाले. अमेरिकेत पदवी पूर्ण केल्यानंतर, मी अभिनेत्री, कोरिओग्राफर आणि डान्सर म्हणून कला क्षेत्रात करिअर केले. या क्षेत्रात खूप काम केल्यानंतर, भारतीय सिने इंडस्ट्रीत काम करण्याची संधी मला ममिळाली, आणि याबद्दल मी खूप आभारी आहे.”

इमानवी प्रभाससोबत फौजी या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि इमानवीसोबत मिथुन चक्रवर्ती देखील दिसणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -