Thursday, April 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द…

भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली?

जम्मू : काश्मीरमधील निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षा यंत्रणा अतिरेकी शोध मोहीमेसह उच्चस्तरावर अलर्ट मोडवर आहेत. भारताचे युद्धसज्ज पवित्रा पाहून पाकिस्तानमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय प्रतिहल्ल्याची धास्ती घेऊन पाकिस्ताननं एलओसीजवळची गावं तातडीनं रिकामी केली असून, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

दहशतवाद्यांच्या कुरापतींचं खापर आता पाकिस्तानच्या डोक्यावर फुटत असून, त्यांच्याच संरक्षणाखाली फोफावलेल्या अतिरेक्यांनी पुन्हा एकदा भारतीय पर्यटकांना लक्ष्य केल्यानं देशभरात संतापाचा भडका उडाला आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेनजीक प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे, तर संरक्षण यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे.

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

सर्जिकल स्ट्राइक, हवाई हल्ला किंवा यावेळी समुद्रमार्गेही कारवाई होण्याची शक्यता पाकिस्ताननं गृहीत धरली असून, सीमेलगतची अनेक गावं रिकामी केली जात आहेत. पाकिस्तानी नौदलाच्या कवायती देखील सुरू आहेत.

पाकिस्तानने भारताच्या सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. फक्त जमिनीवरूनच नाही तर समुद्रातूनही. लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर, पहलगामनंतर भारतीय नौदल प्रत्युत्तर देऊ शकते अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानने लगेचच त्यांच्या नौदलाच्या थेट गोळीबाराच्या सरावाचा इशारा दिला. पाकिस्तानने अरबी समुद्रात दोन दिवसांसाठी ‘नवरेआ अलर्ट’ जारी केला आहे. २३ एप्रिल रोजी थेट गोळीबाराचा इशारा देण्यात आला. हा सराव २४ ते २५ एप्रिल दरम्यान आहे. या इशाऱ्यात, कराची आणि ग्वादरजवळील विमाने आणि व्यापारी जहाजांना या सरावाच्या क्षेत्रापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. या सरावात, पाकिस्तानी नौदलाने पृष्ठभागावर आणि जमिनीखाली थेट गोळीबार केला.

पाकिस्तानमध्ये सध्या कमालीचा गोंधळ असून, लढाऊ विमाने रात्री आकाशात घिरट्या घालत आहेत, तर उच्चस्तरीय लष्करी बैठकांमधून बचावाचे उपाय शोधले जात आहेत.

बालाकोटच्या धडकीदायक आठवणी पाकिस्तानच्या अजून ताज्या असतानाच, भारताकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईची भीती त्यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यातच भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडला अलर्टवर ठेवण्यात आलं असून, युद्धनौका सज्ज करण्यात आल्या आहेत.

संपूर्ण सीमावर्ती वातावरण तणावपूर्ण बनलं असून, भारत आता संयमाच्या सीमारेषेवर आहे. मात्र, जर पुन्हा असा हल्ला झाला, तर भारताकडून कठोर आणि निर्णायक पावले उचलली जातील, हे नक्की!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -