नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू सीमेवर अनेक ठिकाणी शेती, घनदाट जंगल, नदी – नाले – ओढे आहेत. यामुळे सीमा १०० टक्के सील करणे भारतासाठी कठीण आहे. यावर उपाय म्हणून मोदी सरकारने इस्रोच्या उपग्रहांची मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे.
सध्या इस्रोचे ५५ उपग्रह विविध कामांत गुंतले आहेत. लवकरच लहान आकाराचे पण उच्च क्षमतेचे असे १०० ते १५० उपग्रह अंतराळात पाठवून केंद्र सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करणार आहे. यानंतर जर कोणी विना परवानगी पाकिस्तानमधून सागरी अथवा भू सीमा ओलांडून येत असेल तर उपग्रहामुळे जवळच्या सुरक्षा यंत्रणेला संदेश मिळेल. घुसखोरी नेमकी कोणत्या जागेवरुन होत आहे त्याची माहिती मिळेल. घुसखोरांचे लाईव्ह फूटेज उपलब्ध होईल. यामुळे सुरक्षा पथकांना तातडीने कारवाई करुन घुसखोरीला आळा घालणे शक्य होणार आहे.
अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय
केंद्र सरकार सीमेवरील बंदोबस्तासाठी उपग्रहांची मर्यादीत प्रमाणात मदत घेते. पण नव्या योजनेनुसार १०० ते १५० उपग्रह फक्त सागरी तसेच भू सीमा सील करणे आणि घुसखोरीला आळा घालणे यासाठीच वापरले जाणार आहेत. या उपग्रहांचे सीमावर्ती भागात इतर उपयोग पण केले जातील. पण सुरक्षेच्या कारणामुळे या संदर्भात सरकारी पातळीवरुन जास्त माहिती देण्यात आलेली नाही.
भारताचा स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी
भारताने अलिकडेच अंतराळात स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी केला. या प्रयोगांना मिळणाऱ्या यशातूनच भविष्यात भारताला दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपग्रहांना एकमेकांशी जोडणे अथवा अंतराळ स्थानकाची निर्मिती करणे हे शक्य होणार आहे. स्पेस डॉकींगची क्षमता अमेरिका, रशिया, चीन आणि भारत या चार देशांकडेच आहे.