Wednesday, May 14, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गंभीरला ISIS Kashmir या नावाच्या ई मेल अॅड्रेसवरुन एक धमकीचा मेल आला आहे. या प्रकरणी गौतम गंभीरने दिल्लीतील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.







माजी खासदार आणि आता भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला याआधीही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पण यावेळी पहिल्यांदाच त्याला अतिरेकी संघटनेकडून धमकी मिळाली आहे. यामुळे गौतम गंभीर गंभीर दखल घेऊन तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.



गौतम गंभीरसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला २२ एप्रिल रोजी दोन ई मेल आले. दोन्ही ई मेलमधून गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. हे दोन्ही मेल ISIS Kashmir या अकाउंटवरुन आले होते. यानंतर गौतम गंभीरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेची संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दुसरीकडे गौतम गंभीरला धमकी आली. या दोन घटनांचा काही संबंध आहे की वातावरणाचा गैरफायदा घेऊन गंभीरला धमकावण्यात आले आहे ? या दोन्ही शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत.

 
Comments
Add Comment