Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीFawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’...

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यामुळे  भारत सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले असून नुकतेच भारताकडून पाकिस्तानसोबत होणाऱ्या पाणी कराराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारचा अॅक्शन मोड मनोरणजन सृष्टीवरही पडत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (Fawad Khan) आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ (Abir Gulaal Movie) पहलगाम हल्ल्यामुळे अडचणीत सापडला आहे.

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून ‘अबीर गुलाल’ (Abir Gulaal Movie) या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शितच होऊ दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यापुढे आता पाकिस्तानी कलाकारांचा कोणताही आशय भारतात प्रसारित किंवा प्रदर्शित होऊ दिला जाणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. सध्याच्या राजनैतिक आणि सुरक्षा वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

फवाद खानची पहलगाम हल्ल्याबद्दल पोस्ट

फवाद खानने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. “पहलगाममधील भीषण हल्ल्याच्या बातमीने दुःख झाले आहे. आमच्या संवेदना आणि प्रार्थना या भीषण घटनेतील पीडितांच्या पाठीशी आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासाठी हिंमत मिळावी, त्यांना सावरायचं बळ मिळो यासाठी आम्ही प्रार्थना करतो,” असं फवाद खानने लिहिले.

त्याचबरोबर वाणी कपूरने (Vaani Kapoor) देखील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एका पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर हल्ला होताना पाहिल्यापासून मला धक्का बसला आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. मी तुटले आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -