Monday, October 27, 2025
Happy Diwali

Shakti Kapoor: सोन्याचे दर वाढणार; शक्ती कपूरने ३५ वर्षांपूर्वीच केलेली 'ही' भविष्यवाणी

Shakti Kapoor: सोन्याचे दर वाढणार; शक्ती कपूरने ३५ वर्षांपूर्वीच केलेली 'ही' भविष्यवाणी
मुंबई: अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे भाव १ लाख पर्यंत कसे पोहोचले. याचदरम्यान अभिनेता शक्ती कपूर याचा ३५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीने प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. याबाबत, १९९८ मध्ये आलेल्या ‘गुरु’ सिनेमातील शक्ती कपूरची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हिडीओमध्ये शक्ती कपूर म्हणतोय, ‘आणि त्यानंतर सोन्याचे दर वाढणार. ५ हजार तोळं आहे, १० हजार तोळं होणार. त्यानंतर ५० हजार तोळ होणारं… सोनं लाख रुपयांवर जाणार…’ शक्ती कपूरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘शक्ती कपूर शेअर बाजारातील सर्वोत्तम विश्लेषक आहे. सोने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज अनेक दशकांपूर्वी वर्तवण्यात आला होता.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जगातील सर्वोत्तम संशोधन विश्लेषक आणि बॉलिवूडचे बाबा वांगा शक्ती कपूर…’ सध्या सर्वत्र शक्ती कपूर यांची चर्चा रंगली आहे. शक्ती कपूर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमात भूमिका बजावली होती. त्यानंतर शक्ती कपूर यांनी ‘मेरे हस्बँड की बीवी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. त्यानंतर शक्ती कपूर यांनी कोणत्याच सिनेमाची घोषणा केलेली नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >