

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...
#OpBirliGali
Based on specific intelligence, a joint operation with @JmuKmrPolice was launched today in #Basantgarh, #Udhampur.
Contact was established and a fierce firefight ensued.
One of our #Bravehearts sustained grievous injuries in the initial exchange and later succumbed… pic.twitter.com/eojsj5PPuU
— White Knight Corps (@Whiteknight_IA) April 24, 2025

मोदी सरकार भारत - पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू सीमेवर अनेक ठिकाणी शेती, घनदाट जंगल, नदी - नाले - ओढे आहेत. यामुळे सीमा १०० ...
पूँछमध्ये लसाना येथील घनदाट जंगलात अतिरेक्यांच्या विरोधात रोमियो फोर्सने स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपसोबत संयुक्त कारवाई सुरू ठेवली आहे. ही कारवाई १५ एप्रिलपासून सुरू आहे. घनदाट जंगलात शोधून अतिरेक्यांना ठार केले जात आहे.
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. अटारी सीमेवरुन भारत - पाकिस्तान दरम्यानचे येणे - जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना अती दक्षतेचा इशारा दिला आहे. या पाठोपाठ केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.लवकरच पाकिस्तानशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाउंट भारतात ब्लॉक होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी जुलै २०२२, ऑक्टोबर २०२२ आणि मार्च २०२३ मर्यादीत काळासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले होते.