
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली पाण्याची पातळी आणि साखरेची पातळी यांचं संतुलन ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे मधुमेहींनी आहारात कोणते बदल करावेत या लेखातून जाणून घेऊया.
?si=c7rHjFHzE0wBqdAr
उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मधुमेहींनी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. शरीरात साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी संत्री, खरबूज, कलिंगड अशा फळांचं सेवन करता येईल. पण, आंबा, द्राक्षं, केळी ही फळं शक्यतो टाळा. जेवणात चपातीऐवजी भाकरी खायला प्राधान्य द्या. या मोसमात मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश करा. शरीरात उष्णता जाणवत असेल तर भिजवलेल्या सब्जाच्या बिया पाण्यासोबत घ्या. नेहमीच्या पाण्याच्या बाटलीत पुदिना, लिंबू, गवती चहा असे पदार्थ टाकून ते पाणी प्या. त्यामुळे शरीर डीटॉक्स होतं.

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तापमान ४० अंशांवर पोहोचलेले असताना, डोळ्यांचा ...
शरीरात तंतुमय घटकांचं प्रमाणही पुरेसं असु द्या. ज्यांना ड्रायफ्रुट्स आवडतात, त्यांनी ती भिजवून खायला हरकत नाही, मात्र, त्याचं प्रमाण निश्चित करा. आहारात दही, ताक यांचा समावेश करा. दर तीन ते सहा महिन्यांनी रक्तातल्या साखरेची पातळी अवश्य तपासा.