Thursday, April 24, 2025
Homeदेशअटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी कॅबिनेट कमिटी ऑल सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. यात पाकिस्तानविरुद्ध पाच कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार भारताने सिंधू करार पुढे ढकलला असून पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत 48 तासात भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यासोबतच पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्यास आंगण्यात आले आहे. सीसीएसच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यात एका नेपाळी नागरिकाचा समावेश होता. तर २० हून अधिक जण जखमी झालेत. यानंतर सीसीएसची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोवाल,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते.

विक्रम मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७ लोककल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची सुमारे अडीच तास बैठक झाली. सीसीएच्या बैठकीत पाकिस्तानच्या विरोधात 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. तसेच पंजाबच्या अटारी येथील एकात्मिक तपासणी चौकी तात्काळ बंद केला जाईल. ज्यांनी कायदेशीररित्या सीमा ओलांडली आहे त्यांना 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येता येईल. त्याचप्रमाणे सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. भूतकाळात पाकिस्तानी नागरिकांना दिलेले कोणतेही एसपीईएस व्हिसा रद्द मानले जातील. एसपीईएस व्हिसाखाली भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी आहे.

त्याचप्रमाणे नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना अयोग्य व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याला भारत सोडण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. तसेच भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून आपले संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेईल. संबंधित उच्चायोगांमध्ये ही पदे रद्द मानली जातील. यासोबतच सैन्याच्या तिन्ही दलांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.

पाकिस्तानविरुद्ध भारताचे कठोर पाऊल

दुसरा निर्णय असा की पाकिस्तानातील सध्याचे भारताचे दूतवास बंद केले जाईल. यासोबतच भारताने तिसरे पाऊल उचलताना इंडस वॉटर ट्रीटीलाही रोखले आहेत. याचा परिणाम पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

चौथा निर्णय म्ह कणजे भारतातील सर्व पाकिस्तानी राजदूतांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाचवा आणि महत्त्वाचा निर्णय हा आहे की आता पाकिस्तानांना भारताचा व्हिसा मिळणार नाही

याशिवाय SAARC व्हिसा सूट योजनेंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी नाही. आधीपासून व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. तसेच ४८ तासांत त्यांना भारत सोडावा लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -