Wednesday, April 23, 2025
Homeक्राईमलपूनछपून सुरू असलेलं वहिनीचं प्रेम प्रकरण अखेर पेटीतून बाहेर आलं!

लपूनछपून सुरू असलेलं वहिनीचं प्रेम प्रकरण अखेर पेटीतून बाहेर आलं!

आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून रात्रीच्या वेळी येणारे संशयास्पद आवाज तिच्या दिराच्या लक्षात आले. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला गेला, तेव्हा भल्या मोठ्या पेटीमध्ये कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपलेला तिचा प्रियकर सापडला!

घटनेच्या रात्री घरातल्या खोलीतून अनोळखी पुरुषाचा आवाज येत असल्याची कल्पना वहिनीच्या दिराला आली. संशय वाढल्यावर त्याने कुटुंबीयांना जागं केलं आणि सर्वांनी मिळून दरवाजा ठोठावला. दरम्यान, घाबरलेल्या वहिनीने आपला प्रियकर अजयला पेटीमध्ये लपवले. खोलीची तपासणी सुरू झाली, सुरुवातीला काही सापडलं नाही, पण शेवटी कुटुंबीयांचं लक्ष पेटीकडे गेलं.

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

पेटी उघडली आणि भुवया उंचावणारा सत्य समोर आलं. आत लपून बसला होता वहिनीचा प्रियकर अजय! हे दृश्य पाहताच संतप्त कुटुंबीयांनी अजयवर हात साफ केला. त्यानंतर गावकऱ्यांनीही गर्दी करत त्याला बेदम चोप दिला आणि अखेर पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलीस तपासात अजयने कबूल केले की, “तिचा पती घरात नसताना मी तिला भेटायला यायचो.” या दिवशीही तिनेच फोन करून बोलावलं होतं. मात्र, दीर पाणी प्यायला उठल्याने गोंधळ उडाला आणि सगळं पितळ उघडं पडलं.

विवाहित महिला दीर, सासू-सासरे आणि पतीसह राहत होती. प्रेमसंबंध लपवण्यासाठी पेटीचा वापर करणं हे चित्रपटात शोभेल, पण वास्तवात घडलं आणि आता या प्रकरणाने संपूर्ण गावात खमंग चर्चा सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -