Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाIPL 2025SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला हरवत विजयी चौकार ठोकला आहे. या सामन्यात मुंबईने हैदराबादला ७ विकेटनी हरवले. यासोबतच मुंबईने सलग चौथ्या सामन्यात विजय मिळवला आहे.

हैदराबादच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या होत्या. हेनरिक क्लासेनच्या ७१ धावा आणि अभिनव मनोहरच्या ४३ धावांच्या जोरावर हैदराबादने १४३ धावांचा टप्पा गाठला.

पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या हैदराबादची सुरूवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकांत बोल्टने ट्रेविस हेडला बाद केले. हेडला खातेही खोलता आले नाही. यानंतर पुढच्याच षटकांत दीपक चाहरने इशान किशनला बाद केले. यानंतर तिसरी विकेट बोल्टने अभिषेक शर्मा आणि पुढच्याच षटकांत नितीश रेड्डीलाही बाद केले.

यानंतर क्लासेन आणि अनिकेत यांच्यात भागीदारी होतच होती मात्र हार्दिक पांड्याने ९व्या षटकांत त्याला बाद केले. दरम्यान, यानंतर अभिनव मनोहर आणि हेनरिक क्लासेनने हैदराबादचा डाव सांभाळला. क्लासेनने तडाखेबंद खेळी साकारताना ७१ धावा तडकावल्या. त्यामुळे ९ षटकांत ५ विकेट घेणाऱी मुंबई विकेटसाठी वाट पाहत होती. क्लासेनच्या ७१ आणि मनोहरच्या ४१ धावांमुळे हैदराबादला १४३ धावांचा टप्पा गाठता आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -