मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश मिळेल की नाही याबाबत सर्वच कलाकारांना चिंता असते. एवढंच नाही तर आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळावा ही तर संपूर्ण टीमची इच्छा असते. ऑस्कर हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आणि हा पुरस्कार आपल्या चित्रपटाला मिळावा हे सगळ्यांच कलाकारांचं स्वप्न असतं.
आपल्या चित्रपटाच्या यशासाठी कलाकार देवाकडेही मनोभावे प्रार्थना करतात. काहीजण उपवास करतात, काही जण मोठ्या धार्मिक स्थळी जाऊन परमेश्वरासमोर नतमस्तक होतात. अशाच एका अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाच्या यशासाठी कठीण उपासना केली होती. त्याने व्रत ठेवलं होतं त्यासाठी तो तब्बल ४१ दिवस अनवाणी फिरत होता. अखेर त्याचं देवाने ऐकले आणि त्याच्या चित्रपटाला ऑस्कर मिळाला असं भरभरून यश मिळालं.
Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी
कडक व्रत ठेवलं
हा चित्रपट म्हणजे साउथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आरआरआर’ आणि ज्याने यासाठी कडक व्रत ठेवलं होतं तो अभिनेता म्हणजे त्यात मुख्य भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता राम चरण. राम चरणने त्याच्या कारकिर्दीत एकामागून एक हिट चित्रपट दिले. मात्र त्याला खरं यश एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाद्वारे मिळाले.
व्रतात ४१ दिवस अनवाणी आणि फक्त काळे कपडे घालायचे
चित्रपटाच्या यशासाठी त्याने कठोर साधना केली होती. तो ४१ दिवस अनवाणी राहिला आणि तो फक्त काळे कपडे घालत होता. राम चरण हे भगवान अयप्पा यांचा महान भक्त आहे. अनेक लोक ४१ दिवस भगवान अय्यप्पाची कठोर साधना करतात. यामध्ये साधकाला ४१ दिवस अनवाणी राहावे लागते. शाकाहारी जेवण घ्यावे लागते आणि फक्त काळ्या रंगाचे कपडे घालावे लागतात. याशिवाय, इतर अनेक कठोर नियमांचे पालन करावे लागते.
४१ दिवसांनंतर, केरळमधील सबरीमाला येथील अयप्पा स्वामी मंदिरात जाऊन भक्तांना साधना पूर्ण करावी लागते. आरआरआरच्या रिलीजच्या वेळी, राम या साधनेत होता. एका रिपोर्टनुसार राम चरण वयाच्या २० व्या वर्षापासून ही साधना करत आहेत आणि तो वर्षातून दोनदा त्यात भाग घेतो.
२०२३ मध्ये ऑस्कर जिंकला
राम चरणसोबत ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांनीही ‘आरआरआर’मध्ये काम केले होते. या चित्रपटाने जगभरात १२५० कोटी रुपये कमावले तसेच या चित्रपटाने २०२३ मध्ये ‘नातू नातू’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीत ऑस्कर जिंकला.
View this post on Instagram