नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले आहेत.
पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट समाप्त केला आहे. ते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives in Delhi after cutting short his Saudi Arabia visit in view of the #PahalgamTerroristAttack in Kashmir
(Source – ANI/DD) pic.twitter.com/5WAk8kL0g5
— ANI (@ANI) April 23, 2025
आज कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटीची बैठक आहे त्यात ते सामील होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प आणि सौदीचे राजा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत फोनवर बातचीत झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्च स्तरीय बैठकही घेतली.
पंतप्रधान मोदींनी केली हल्ल्याची निंदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ते सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले की, ज्यांनी हे असे कृत्य केले आहे त्यांना कटघऱ्यामध्ये आणले जाईल. कोणतीही दया केली जाणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प दृढ आहे.
दहशतवाद्यांचा शोध सुरू
या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे वेक्टर फोर्स, स्पेशल फोर्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे. या अभियानात सर्वात पुढे आहे ते वेक्टर फोर्स. कारण या खोऱ्यात निर्णायक कारवाईसाठी त्यांना ओळखले जाते.