Wednesday, April 23, 2025
Homeक्राईमPahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश हादरला. या भीषण घटनेत २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून निवडक हत्या केल्याचे उघड झाल्याने संतापाचा अजूनच उद्रेक झाला आहे.

या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत चार दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यापैकी दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लेखोरांचा एक फोटो देखील समोर आला आहे. बैसरन परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चार जणांनी थेट हल्ला केला, तर आणखी तीन जण दूरवरून कारवाईवर लक्ष ठेवून होते, अशी माहितीही समोर आली आहे.

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

हल्लेखोरांनी पश्तून भाषेत संवाद साधत, जवळपास १५ ते २० मिनिटे एके-४७ रायफलमधून गोळीबार केला. त्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत ठरवून ठार मारल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.

स्थानिक दहशतवाद्यांपैकी आदिल गुरी आणि आसिफ शेख यांची नावे निष्पन्न झाली आहेत. तर उर्वरित दोन दहशतवादी पाकिस्तानातून आलेले असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या अमानवी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

देशभरातून या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असून, संबंधित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -