Wednesday, May 14, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना...! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना...! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं


दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं?


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधल्या (Jammu And Kashmir) पहलगाम (Pehalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कानपूरच्या शुभम द्विवेदी (Shubham Dwivedi) नावाच्या एका नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. २३ एप्रिलला दुपारी २.३०च्या सुमारास ही घटना घडली. २ महिन्यापूर्वी शुभम द्विवेदीनं नव्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली होती. शेरवानी घालून घोड्यावर बसून स्टेजवर नाचत नाचत पत्नी ऐशान्याचा हात हाती घेतला होता. लग्नातील हे सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. प्रत्येक फोटोत त्याचे हास्य दिसून येत होते. परंतु कुणास ठाऊक अवघ्या २ महिन्यातच हे फोटो पाहून कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू वाहतील. मयत शुभम आपल्या पत्नीसोबत हनीमूनसाठी गेला होता. दहशतवाद्यांनी बैसापूर परिसरामध्ये अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात २६ लोकांचा बळी गेला. हल्लेखोरांनी धर्म विचारून लोकांना मारले. शुभमचे वडील संजय द्विवेदी हे सिमेंटचे व्यापारी आहेत. शुभम १२ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकला होता. या हल्ल्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.



शुभमच्या पत्नीची विनंती


मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. १२ फेब्रुवारीला शुभम विवाहबंधनात अडकलेला होता. त्याचे वडील संजय द्विवेदी हे सिमेंटचे मोठे व्यापारी आहेत. शुभम लवकरच काश्मीरमधून परत येणार होता. ज्यावेळी दहशतवादी शुभमवर गोळ्या झाडत होते, त्यावेळी त्याच्या पत्नीने त्यांना विनंती केली की, "मलासुद्धा मारा". यावर दहशतवाद्यांनी उत्तर दिले, "आम्ही तुला मारणार नाही. आम्ही तुला जिवंत सोडत आहोत, जेणेकरून तू आपल्या सरकारला जाऊन सांगशील की आम्ही काय-काय केले आहे."


शुभमच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी समजताच एकच आक्रोश सुरू झाला. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे भ्याड हल्ला करून शुभमला मारले, त्याच प्रकारे सरकारनेही त्यांच्याकडून बदला घ्यायला हवा. त्यांनी सरकारकडे शुभमचे पार्थिव लवकरात लवकर घरी पाठवण्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांचे १० सदस्य पहलगाममध्ये आहेत. त्यापैकी काही जण लवकरच दिल्लीला परतणार आहेत. कानपूरहून काही लोक दिल्लीला जाणार आहेत, कारण शुभमचे पार्थिव दिल्लीला आणले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथून शुभमचे पार्थिव त्याच्या मूळ गावी हाथीपूरला नेले जाईल.


नवऱ्याच्या अचानक मृत्यूने पत्नीला धक्का बसला आहे. शुभमचे वडील कानपूरमध्ये सिमेंटचा व्यवसाय करतात. बुधवारी शुभम जम्मू काश्मीरवरून परतणार होता. परंतु त्याच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबात शोककळा पसरली. दहशतवाद्यांनी ज्यारितीने शुभमला मारले त्यांनाही असेच उत्तर द्या अशी मागणी कुटुंबीय करत आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सरकारने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अनेक पर्यटकांनी आपली काश्मीरची यात्रा रद्द केली आहे.

Comments
Add Comment