दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. पाकिस्तानवर आधी सर्जिकल स्ट्राईक, नंतर एअर स्ट्राईक करणारा भारत आता काय करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नाचे उत्तर गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान मोदी देतील, असे सूत्रांकडून समजते. पहलगामच्या घटनेनंतरची पंतप्रधान मोदींची पहिली जाहीर सभा गुरुवारी बिहारमध्ये आहे. ही सभा दरभंगा येथे होणार आहे.
पुलवामा येथे २०१९ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी सीआरपीएफच्या वाहनांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला होता. यानंतर राजस्थानमध्ये चुरू येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा पथकांना योग्य ती कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे सांगितले होते. यानंतर भारताच्या हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन अतिरेक्यांविरोधात कारवाई केली होती. थेट पाकिस्तानमध्ये जाऊन ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे आता गुरुवारी मोदी दरभंगामध्ये काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक
पहलगाम अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक
पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतरच्या महत्त्वाच्या घडामोडी
- दिल्लीत केंद्रीय संरक्षण समितीची बैठक
- जम्मू काश्मीरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ
- दिल्ली आणि काश्मीरमध्ये सुरक्षेशी संबंधित बैठकांना वेग
- तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध