शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान समोर आलं आहे ‘गोल्ड एटीएम’. Gold ATM हे एटीएम म्हणजे फक्त पैसे काढण्यासाठीच नव्हे, तर थेट सोनं विकण्यासाठीही वापरलं जातंय. विशेष म्हणजे, या यंत्रात दागिने टाकले की ते आपोआप शुद्धता तपासते, वितळवते, वजन करते आणि बाजारातील चालू भावानुसार त्याची किंमत ठरवते. अवघ्या २० मिनिटांत व्यवहार पूर्ण होतो आणि नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
शांघायच्या सर्वांत गजबजलेल्या मॉलमधील Gold ATM या यंत्राने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे मशीन वापरण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यंत्राद्वारे फक्त ३ ग्रॅमपेक्षा जास्त आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक शुद्धतेचं सोनेच स्वीकारलं जातं. त्यामुळे अनेकजण आपलं वारसाहक्काचं किंवा जुने दागिने घेऊन येत आहेत. गर्दी इतकी वाढली आहे की मॉलच्या वेळेनंतरही कर्मचार्यांना थांबून मदत करावी लागत आहे.
Gold ATM यंत्र बसवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनुसार, जवळपास ७० टक्के वापरकर्ते या एटीएममध्ये आपले जुने दागिने विकणाऱ्या वयस्क महिलाच आहेत. या महिला खास करून दिवसाच्या वेळात येतात आणि जुन्या स्टाईलचे नेकलेस, बांगड्या इत्यादी विकतात. एका डेमोमध्ये ४० ग्रॅमच्या नेकलेससाठी एका ग्रॅमला ७८५ युआन म्हणजे जवळपास ९,२०० रुपये मिळाले. काही मिनिटांतच ३६,००० युआन म्हणजे जवळपास ४.२ लाख रुपये एटीएममध्ये जमा झाले.
Gold ATM या एटीएमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता. दुकानांमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत शंका असते, किंमत कळत नाही. मात्र या यंत्रामुळे व्यवहारात कोणताही फसवणुकीचा धोका नाही. त्यामुळेच शांघायमधील नागरिक याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.
‘सिक्स्थ टोन’ या मासिकाच्या माहितीनुसार, चीनमध्ये अशा प्रकारची मशीन जवळपास १०० शहरांमध्ये मॉल्स, बँका आणि ऑफिस इमारतींमध्ये बसवण्यात आली आहेत. लवकरच शांघायमध्ये याच पद्धतीच्या आणखी Gold ATM यंत्रांची स्थापना होणार आहे, कारण लोकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
सोन्याच्या Gold ATM या तांत्रिक क्रांतीमुळे सोशल मीडियावरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी म्हणतं, “यामुळे डॉलरचं साम्राज्यच कोसळेल,” तर काही जण म्हणतात, “चीन जगापुढे तंत्रज्ञानात किती पुढे आहे, याचा हा पुरावा आहे.”
सध्या संपूर्ण जगभरात सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या असून, भारतासारख्या मोठ्या बाजारातही गुंतवणुकीची आणि विक्रीची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या या Gold ATM यंत्राने जगभरात खळबळ माजवली असून, भविष्यात अशीच सोने विक्री करणारी एटीएम यंत्रणा इतर देशांमध्येही पाहायला मिळेल, यात शंका नाही.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…