मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ सोशल मीडियावर वादात सापडला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे. ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली आहे. अनेकांनी “देशप्रेमापेक्षा चित्रपट महत्त्वाचा नाही” असे म्हणत चित्रपट निर्मात्यांवर आणि कलाकारांवर टीका केली आहे.
सध्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा किंवा कोणतीही प्रतिक्रिया निर्मात्यांकडून आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील बहिष्कार मोहिम पाहता निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रचारात अडचणी येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या वादावर चित्रपट टीमकडून स्पष्टीकरण येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..
पहलगाम येथील हल्ल्यात जवानांना लक्ष्य केल्याने देशभरात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये स्थान दिले जात असल्याचे अनेकांना खटकले आहे.अनेकांनी केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाकडे अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काहींनी असेही नमूद केले आहे की, जर बॉलिवूडला राष्ट्रहित जपायचे असेल, तर पाकिस्तानी कलाकारांनवर बंदी घातलीच पाहिजे.
View this post on Instagram