मुंबईचा वीज वापर ‘४००० मेगावॅट’ पार!
तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी
मुंबई : राज्यातील उष्णतेच्या झळा वाढताच वीजवापरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्राची वीज मागणी ३०,९२१ मेगावॅट इतकी विक्रमी नोंदवली गेली. त्याच दिवशी केवळ मुंबई शहराचा वीज वापर ४,०५५ मेगावॅटवर पोहोचला.
मुंबईत अडाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्ट या कंपन्यांनी वाढती मागणी लक्षात घेता विशेष व्यवस्था आखली असून, नागरिकांना वीज बचतीचे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.
चीनमध्ये ‘गोल्ड एटीएम’चा धुमाकूळ; आता एटीएमद्वारे सोने द्या, पैसे घ्या!
राज्यभरात वीज पुरवणाऱ्या महावितरणची (MSEDCL) मागणी २६,८६७ मेगावॅट इतकी झाली. याआधी १३ मार्च रोजी २७,१२६ मेगावॅटची मागणी झाली होती, ती यंदाच्या हंगामातील सर्वोच्च नोंद आहे.
वाढत्या वीज वापरामुळे भारनियमनाची शक्यता सध्या तरी नाही, मात्र नागरिकांनी शक्यतो विजेचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.