Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपुस्तकांचे पालकत्व

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी

ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक
आवड जयास उजळ मस्तक

नवी जीवनाची प्रगती आणि विकास प्राणीमात्रापासून झाला आहे अशा नोंदी वाचायला मिळतात. मग हा अभ्यास आपल्याला कसा समजतो? हे आणि असे आपले अज्ञान दूर करणारे समस्त ब्रह्मांडाचे ज्ञान आपणास पुस्तकातून मिळते. खरंतर पुस्तक म्हणजे काय बर..? पुस्तक म्हणजे माहिती संकलित करून तिच्या नोंदी एकत्रितरीत्या लिखित स्वरूपात प्रसिद्ध करणे ही माझ्या ढोबळ मनाने केलेली पुस्तकाची व्याख्या. कुठल्याही पुस्तकाची एकदा निर्मिती झाली की, ते युगानुयुगे राहते आणि कैक पिढ्यांना त्याचा लाभ घेता येतो. प्राचीन काळी जेव्हा पुस्तक नव्हते त्यावेळी या नोंदी ताम्रपत्रावर पूर्वज लिहून ठेवायचे आणि त्याचा उपयोग वाचणाऱ्याना होत असे. कालांतराने मानवाने प्रगती केली आणि कागदी स्वरूपात पुस्तक तयार होऊ लागले. पुस्तक बनविणे ही सुद्धा एक नियोजनबद्ध कला आहे. आशयची मांडणी ही लेखक करतो आणि स्वरूप कसे असावे हे त्या पुस्तकाला डिझाईन करणारा ठरवतो. पुस्तक निरनिराळ्या आकारात, निरनिराळ्या बाईंडिंगमध्येही उपलब्ध होतात. आधुनिक युगातील पुस्तक, तर डिजीटल/ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहेत. पुस्तकांच्या किमती या त्यात असणाऱ्या मथळ्याच्या उपयुक्ततेवर ठरतात. भारताच्या रुपयात मिळणारे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर भिन्न देशांच्या करन्सीमध्ये देखील उपलब्ध असते. पुस्तकांच्या निर्मितीमुळे कैक लोकांची उपजीविका त्या संबंधित व्यवसायात होते. पुस्तकासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या क्वालिटीमध्येही फरक असतो. बाह्यपृष्ठ बहुदा रंगीबेरंगी वाचकांना आकर्षक वाटणारे असते तर बहुतांश पुस्तकांची आतील पाने पांढऱ्या रंगाचीच असतात. भिन्न प्रकारात, भाषेत, स्वरूपात, ज्ञानात उपलब्धअसणारी ही पुस्तके मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असतात. उदाहरण द्यायचे झालं तर मानवाच्या जन्मापासून होणाऱ्या विकासात प्रत्येक भिन्न अवस्थेसाठी पुस्तके सहकार्य करत असतात. शैक्षणिक विकासात तर शिक्षणाचे केंद्रस्थान पुस्तक असते. पुस्तकाची निर्मिती करणारे थोर व्यक्ती लेखक म्हणून ओळखले जातात. या लेखकाचे पुस्तकासाठी असणारे महत्व अनन्य साधारण असते. आणि पुस्तकात असणाऱ्या नोंदीवर लेखकांचे सर्वस्वी हक्क असतात.

ज्याला कॉपीराईट असे म्हणतात.
हे कॉपीराईट म्हणजे काय?

कॉपीराइट म्हणजे मौलिकता आणि स्थिरता. मूळ कामे जेव्हा एखादी कलाकृती मानवी लेखकाने स्वतंत्रपणे तयार केली असेल आणि त्यात किमान सर्जनशीलता असेल तेव्हा ती मूळ असते. स्वतंत्र निर्मितीचा अर्थ असा आहे की, तुम्ही ती स्वतः तयार करा, कॉपी न करता. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सर्जनशील होण्यासाठी, एखाद्या कलाकृतीमध्ये सर्जनशीलतेचा “स्पार्क” आणि “मोडिकम” असणे आवश्यक आहे. तथापि, काही गोष्टी अशा आहेत ज्या सर्जनशील नाहीत, जसे की, शीर्षके, नावे, लहान वाक्ये आणि घोषणा; परिचित चिन्हे किंवा डिझाइन; टायपोग्राफिक अलंकार, अक्षरे किंवा रंगसंगतीचे केवळ बदल; आणि घटक किंवा सामग्रीची केवळ यादी. आणि नेहमी लक्षात ठेवा की कॉपीराइट अभिव्यक्तीचे संरक्षण करतो, कल्पना, कार्यपद्धती, पद्धती, प्रणाली, प्रक्रिया, संकल्पना, तत्त्वे किंवा शोधांचे कधीही संरक्षण करत नाही. थोडक्यात आपण केलेल्या साहित्य निर्मितीवर फक्त आपलाच हक्क असावा. इतर कुणीही त्यावर हक्क सांगू शकणार नाही याची केलेली तरतूद. माझ्या साहित्यिक मनाने त्याची केलेली व्याख्या म्हणजे पुस्तकांचे पालकत्व.
पुस्तकाची निर्मिती करणारा लेखक/ लेखिका हे त्या पुस्तकाचे निर्मितिकार हे आपल्या विचारांनी लिखाण करून पुस्तकाची निर्मिती करतात म्हणजे एका अर्थी ते त्या पुस्तकाचे पालक असतात. इथे मी स्वतःचे उदाहरण देईन. माझ्या चारोळी संग्रहाची, काव्य संग्रहाची सर्वस्वी पालक मी स्वतः असते. कारण त्यातला आशय, त्याची मांडणी, त्याचे पुस्तकीकारण असे सगळेच मी स्वतः केले आहे. म्हणजे एका अर्थी ते माझे पाल्य म्हणायला हरकत नाही. मी निर्मिलेल्या माझ्या लिखाणाचर सर्वस्वी हक्क माझा असावा… दुसरं कुणीही ते स्वतःच आहे अस म्हणू नये यासाठी केलेली तरतूद म्हणजे कॉपीराईट.
२३ एप्रिल हा दिवस जगतोक पुस्तक दिन आणि कॉपीराईट म्हणजेच मौलिकता (मौलिकतेचा अधिकार) म्हणून जगभर साजरा केला जातो. समस्त विश्वतील लेखकांना त्यांच्या लिखाणाच्या/ निर्मितीच्या असणाऱ्या स्वहक्काचे अधिकार देणारा मौलिकता सांगणारा दिवस हा जागतिक पुस्तक दिन व मौलिकता दिन म्हणुन साजरा केला जातो. त्या द्वारे पुस्तकांचे पालकात्व त्याच्या लेखकांकडे अबाधित राहते. त्या दिवसाचे औचित्य साधून वाचनाची जनजागृती करणारे अनेक कार्यक्रम आयोजन केले जाते.

पुस्तक सांगतात गोष्टी
पुस्तक देतात ज्ञान
ज्ञानदायी समृद्धीचा
सर्व जगी अभिमान

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -