Wednesday, April 23, 2025
Homeदेशकाश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर – ए – तोयबा या संघटनेच्या अतिरेक्यांचा हात असल्याचे सूत्रांकडून समजते. अद्याप या संदर्भात अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात ५६ विदेशी अतिरेकी लपले आहेत. यात लष्कर – ए – तोयबाचे ३५, जैश – ए – मोहम्मदचे १८ आणि हिजबुल मुजाहिदीनचे तीन अतिरेकी आहेत. या व्यतिरिक्त १७ स्थानिक अतिरेकी आहेत. काही स्थानिक अतिरेकी कारवायांना मदत देत आहेत. या सर्वांमुळेच अद्याप काश्मीर खोरे दहशतवादमुक्त झालेले नाही.

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यापैकी सहा जण महाराष्ट्रातील आहेत. या घटनेनंतर सुरक्षा पथकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये तसेच देशात इतरत्र अनेक महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तर प्रमुख रस्त्यांवर सुरक्षा जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नागरिकांची अंगझडती तसेच त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी सुरू झाली आहे. सुरक्षा पथकाने जम्मू काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात दोन अतिरेक्यांना ठार केले आहे.

सुरक्षा पथकांनी पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी झालेल्या तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहे. या अतिरेक्यांना जीवंत अथवा मृत ताब्यात घेण्यासाठी सुरक्षा पथकांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या लष्कर – ए – तोयबाशी संबंधित एका गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. प्रत्यक्षात हा पूर्ण हल्ला पाकिस्तानमधूनच नियंत्रित झाला आणि लष्कर – ए – तोयबानेच अंमलात आणला, असे सूत्रांकडून समजते. आयएसआय आणि पाकिस्तानच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसारच पहलगाममध्ये हल्ला झाल्याचे सूत्रांकडून समजते. या हल्ल्याच्या उद्देश जम्मू काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीला खीळ बसवणे हाच आहे. यामुळे लवकरात लवकरच अतिरेक्यांचा बीमोड केला तरच परिस्थिती सुधारेल, असे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -