Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीAbhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: “भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे” संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी उमेद देतो.जगभरात स्वामींचे असंख्य भक्त आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत याची प्रचिती ते सर्वाना करून देतातच. स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त मठात जात असतात. स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी मठात गेलेल्या अभिनेत्रीच्या पतीला देखील विलक्षण अनुभव आला, तो त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा नवरा मेहुल पै याला स्वामींच्या मठात गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला. त्याने सोशल मीडियावर आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. सध्या महुल याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… त्याच्या पोस्टवर स्वामी भक्त देखील ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणत कमेंट करत आहे.

मेहुल आलेला अनुभव सांगत म्हणाला, आजचा माझा दिवस आणि अनुभव,,,19 एप्रिल 2025… आजचा दिवस खूप वेगळा आणि अंतर्मुख करणारा होता. मी मठात गेलो होतो आणि पायऱ्या चढत असताना एक वृद्ध आजोबा भेटले. त्यांच्या हातातली एक साधी प्लास्टिकची पिशवी मला धरायला दिली. त्यांच्या हालचालींत एक अशक्तपणा जाणवत होता… आणि तेव्हा जाणवलं, कदाचित त्यांना Parkinson चा त्रास असावा. ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले, “मी आधी स्वामींच्या पायांपडतो, मग माझी बॅग धरतो… आता तू पायांपड.” त्या शब्दांतली त्यांच्या भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शन गेलं. मग आम्ही एकत्र सगळ्या देवांचे दर्शन घेतले.

Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

दर्शनानंतर ते उपासनेला बसले. शांत, गूढ आणि स्थिर नजरेतून त्यांनी विचारलं, “थोडा वेळ थांबशील का मी उपासना करे पर्यंत ? मी थांबलो… आणि त्या क्षणात एक न सांगता येणारा आत्मिक संवाद झाला. उपासना झाल्यावर आम्ही बाहेर आलो. त्यांनी खूप आपुलकीने विचारलं, “घरी कोण-कोण आह रे तुझ्या ?” मी प्रेमाने सगळं सांगितल्यावर, ते म्हणाले, “येत्या 24 एप्रिलला बायकोला पुरणपोळी करायला सांग… आणि मग परत मठात ये. इथेच स्वामींपुढे ती ठेव. आणि बघ… लवकरच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” थोड्या वेळाने, ते हसत म्हणाले, “तू कुठे चाललायस?” आणि शेवटी हळुवारपणे विचारलं -“थोडं पुढे रस्ता क्रॉस करून देशील का?”

असं झालं आज स्वामींचं दर्शन… एक साधा वाटणारा प्रसंग… पण मनाच्या आत खोलवर स्पर्श करून गेला. कधी कधी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आपुलकी, रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक खरी वाटते… “स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण, मनात आयुष्यभरासाठी घर करून जातात… आणि त्यांची कृपा कोणत्या रूपात भेटेल, हे कधीच सांगता येत नाही.” सध्या मेहुल पै याची पोस्ट चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meihul R Paii (@mehul_pai)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -