Lalit Machanda Suicide: 'तारक मेहता....' फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी 'या' कारणांमुळे केली आत्महत्या

  143

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ती बातमी म्हणजे, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेत काम करणारे अभिनेते ललित मनचंदा यांनी गळफास घेऊन (Lalit Machanda Suicide) आयुष्य संपवलंय.


प्राथमिक माहितीनुसार, ललित मनचंदा उत्तर प्रदेशातील मेरठ येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांचे वय 36 वर्षे होते. ललित मनचंदा यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.



मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी होणार


ललित मनचंदा हे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कॉमेडी मालिकेत त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांनी 'क्राइम पेट्रोल' या मालिकेतही काम केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.​ या प्रकरणात आता पोलीस चौकशी होणार असून त्यांच्या मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यांचा मृतदेहावर पोस्टमॉर्टेम करण्यात आला असून सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत.



आर्थिक अडचणीचा सामना


ललित मनचंदा यांनी इंडियाज मोस्ट वॉन्टेड, क्राईम पेट्रोल, मरियम, झांसी की रानी आणि ये रिश्ता क्या कहलाता है यासह अनेक मालिकांमध्ये सहायक अभिनेता म्हणून काम केले होते. मात्र गेले काही महिने काम न मिळाल्याने ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे त्यांनी ६ महिन्यांपूर्वी मुंबई सोडून मेरठ येथील त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मेरठ येथील त्यांचा भाऊ संजय मनचंदाच्या घरी त्यांनी गळफास घेत आयुष्य संपावल.



कुटुंबावर शोककळा


ललित मनचंदा यांच्या पश्चात पत्नी तारू मनचंदा, १८ वर्षांचा मुलगा उज्ज्वल मनचंदा आणि मुलगी श्रेया मनचंदा असा परिवार आहे. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते रविवारी रात्री झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. सोमवारी सकाळी त्याच्या कुटुंबातील सदस्य त्यांना चहासाठी उठवण्यास गेली असता, त्यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी संध्याकाळी उशिरा अंतिम संस्कार केले. सध्या या बातमीने कुटुंबातील सदस्यच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनाही धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...

काल 'रामायण: द इंट्रोडक्शन' हा सिनेमा नऊ शहरांमध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा झाली आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह

प्राजक्ता माळीचा आहे पंढरपूरशी खासगी संबंध...

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच तिच्या खाजगी आयुष्यात देखील तितकीच ऍक्टिव्ह असते.अनेक वेळा ती

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’चा अंतिम सोहळा...

सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांनसमोर सातत्याने आणले

रविंद्र नाट्य मंदिर मध्ये 'एक तिची गोष्ट' नाटकाचा पहिल्या प्रयोगच शानदार सादरीकरण ...

'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य,

राशिचक्रकार शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेंवर निशाणा.. म्हणतात 'गर्विष्ठ... '

झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या

थकलेल्या वारकऱ्यांचे पाय दाबून आदेश बांदेकर यांनी केली सेवा; हृषिकेश आणि सारंगही होते सोबत

मुंबई: अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर यांनी 'माऊली महाराष्ट्राची' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर