Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीLalit Machanda Suicide: 'तारक मेहता....' फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी 'या'...

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ती बातमी म्हणजे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेत काम करणारे अभिनेते ललित मनचंदा यांनी गळफास घेऊन (Lalit Machanda Suicide) आयुष्य संपवलंय.

प्राथमिक माहितीनुसार, ललित मनचंदा उत्तर प्रदेशातील मेरठ येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांचे वय 36 वर्षे होते. ललित मनचंदा यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी होणार

ललित मनचंदा हे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कॉमेडी मालिकेत त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांनी ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकेतही काम केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.​ या प्रकरणात आता पोलीस चौकशी होणार असून त्यांच्या मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यांचा मृतदेहावर पोस्टमॉर्टेम करण्यात आला असून सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत.

आर्थिक अडचणीचा सामना

ललित मनचंदा यांनी इंडियाज मोस्ट वॉन्टेड, क्राईम पेट्रोल, मरियम, झांसी की रानी आणि ये रिश्ता क्या कहलाता है यासह अनेक मालिकांमध्ये सहायक अभिनेता म्हणून काम केले होते. मात्र गेले काही महिने काम न मिळाल्याने ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे त्यांनी ६ महिन्यांपूर्वी मुंबई सोडून मेरठ येथील त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मेरठ येथील त्यांचा भाऊ संजय मनचंदाच्या घरी त्यांनी गळफास घेत आयुष्य संपावल.

कुटुंबावर शोककळा

ललित मनचंदा यांच्या पश्चात पत्नी तारू मनचंदा, १८ वर्षांचा मुलगा उज्ज्वल मनचंदा आणि मुलगी श्रेया मनचंदा असा परिवार आहे. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते रविवारी रात्री झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. सोमवारी सकाळी त्याच्या कुटुंबातील सदस्य त्यांना चहासाठी उठवण्यास गेली असता, त्यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी संध्याकाळी उशिरा अंतिम संस्कार केले. सध्या या बातमीने कुटुंबातील सदस्यच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनाही धक्का बसला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -