पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या घडामोडी समोर येत आहेत. त्यातूनही तरूण मुलांची टोळकी जास्तकरून पाहायला मिळते आहे. यावेळी असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वारांनी एका जोडप्याच्या गाडीवर हल्ला केला.
Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय
पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या टवाळखोरांनी एका दांपत्यावर हल्ला केला आहे. दारूच्या नशेत दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी या दांपत्याची वाट अडवली. कोणालाही पुढे जाऊ न देता रस्त्याच्या मध्यभागाहून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होते. मागून येणाऱ्या या दांपत्यांनी हॉर्न वाजवून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र या दांपत्याने हॉर्न वाजवल्यामुळे नशेत असलेल्या तरुणांनी गाडीवरून उतरून या जोडप्यावर हल्ला केला.
View this post on Instagram
नशेत असलेल्या बेधुंद तरुणांनी आधी त्या दोघांना मारहाण केली त्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. महिलेच्या पोटात लाथ मारली आणि तिच्या तोंडावर मारले. या जोडप्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.