Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

Pahalgam Terror Attack:  पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अतुल मोने आणि दिलीप डिसले अशी त्यांनी नावे आहेत.


जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. ज्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची संलग्न संघटना आहे. पाकिस्तानमध्ये राहणारा शेख सज्जाद गुल हा टीआरएफचा प्रमुख आहे.


पुण्यातील ५ जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेले होते. ज्यामधे २ पुरुष आणि ३ महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालू न फोटो काढत होतं. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे.


पहलगाम हल्ल्याची माहिती पुढे याताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांना फोन करुन या हल्ल्याची माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी आहेत. जखमींमध्ये माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. तर एस भालचंद्र राव हे राज्यातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान या पर्यटकांना जी काही मदत लागेल ती मदत प्रशासन करत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment