Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीNamo Bharat: नमो भारत ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल, बिहारमधील ग्रामिण...

Namo Bharat: नमो भारत ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल, बिहारमधील ग्रामिण भागाचे स्वप्न सत्यात उतरेल!

पाटणा : नमो भारत रॅपिड ट्रेन १६० किमी वेगाने धावणारी, जयनगर सीमावर्ती भागातील लोकांना राजधानी पाटणाशी थेट जोडणी प्रदान करणारी, शिवाय प्रवाशांना सोयीस्कर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देखील देईल. ही ट्रेन प्रवाशांसाठी हलक्या, पॅडेड सीट्स, ऑटोमॅटिक दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि टक्करविरोधी चिलखत प्रणाली यासारख्या आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.

ज्या सीमावर्ती भागात वर्षानुवर्षं विकास फक्त भाषणांमध्येच दिसला, तिथून आता राजधानी पाटणापर्यंतचा प्रवास मोदी सरकारच्या इच्छाशक्तीमुळे केवळ काही तासांत होणार आहे.

नवी मुंबईत बसमध्ये लैंगिक संबंध! कंडक्टरवर कारवाई, पण पोलीस अजून गप्प का?

काय आहे ही ‘नमो भारत’ ट्रेन?

जयनगरसारख्या दूरवरच्या सीमावर्ती जिल्ह्यातून पाटणाशी थेट जोडणी देणारी १६० किमी प्रतितास वेगाने धावणारी ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन आता प्रत्यक्षात धावणार आहे. ही ट्रेन फक्त वेगाने धावणार नाही, तर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देखील देणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी काय काय?

  • पॅडेड, हलक्या सीट्स,
  • सीसीटीव्ही सुरक्षा,
  • टक्करविरोधी संरचना,
  • स्वयंचलित दरवाजे,
  • अ‍ॅल्युमिनियम सामान रॅक,
  • मोबाईल चार्जिंग पॉइंट,
  • एलसीडी डिस्प्ले,
  • डिफ्यूज्ड एलईडी लाईटिंग,
  • आणि कोचमधून कोचमध्ये जाण्यासाठी सीलबंद गॅंगवे
  • यामुळे केवळ वेगच नाही, तर आरामदायी, आधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचीही हमी मिळते.
  • महिलांसाठी विशेष कोच – सक्षमीकरणाची दिशा

नमो भारत ट्रेनमध्ये महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एका खास कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र कोचची सोय ही केवळ सोयीसाठी नाही, तर सुरक्षिततेची खात्री आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.

वाहतूक आणि पर्यावरणावर परिणाम?

ही ट्रेन रस्त्यांवरील वाहतूक कमी करेल, प्रदूषण आणि अपघात टाळेल, त्यामुळे ती हरित आणि शाश्वत वाहतूक प्रणाली ठरणार आहे. ‘नमो भारत’ ट्रेन मिथिला आणि समस्तीपूरसारख्या भागांतील जनतेसाठी अभिमान, कनेक्टिव्हिटी आणि प्रगतीचं प्रतीक आहे. या ट्रेनमुळे स्थानिकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक संधींचा नवा अध्याय खुला होईल. मोदी सरकारचे हे ऐतिहासिक पाऊल राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला नवीन उंचीवर नेण्यास मदत करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -