Friday, October 24, 2025
Happy Diwali

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा...

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा...

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार

रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्ताराचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहेत. मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत जाईल. जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस गाडीही सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावणार आहे. तिन्ही गाड्यांचे अशा प्रकारचे वेळापत्रक ३० एप्रिलपर्यंत असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामांनी वेग धरला आहे. त्यामुळे या फलाटावर येणाऱ्या रेल्वेगाड्या इतर फलाटावर पाठवण्यात येतात. काही रेल्वेगाड्या फलाटाच्या अभावामुळे त्यांचा सीएसएमटी थांबा रद्द केला आहे. यामध्ये कोकणातील तीन रेल्वेगाड्या आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटावरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. परंतु सध्या सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत धावेल. गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. अशा पद्धतीचे वेळापत्रक ३० एप्रिलपर्यंत चालवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >