Monday, May 12, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या फसवणुकीशी संबंधित कथिक मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात ईडीने समन्स बजावले आहेत. त्यांना आगामी २७ एप्रिल रोजी हैदराबाद येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या रिअल इस्टेट कंपन्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हे समन्स पाठवण्यात आले आहे. महेश बाबू हे या कंपन्यांच्या ग्रीन मेडोज प्रकल्पाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्यामुळे साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपच्या काही संशयास्पद प्रकल्पांच्या जाहिराती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसोबत झालेल्या कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money Laundering) चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. सुराणा ग्रुप आणि साई सूर्या डेव्हलपर्सवर ही कारवाई करण्यात आली. सिकंदराबाद, जुबली हिल्स आणि बोवेनपल्ली येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपने सुरू केलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांच्या प्रमोशनल जाहिरातींमध्ये महेशबाबूने काम केले होते. या जाहिरातींसाठी त्यांना ५.९ कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त आहे. यापैकी ३.४ कोटी रुपये चेकद्वारे आणि २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात मिळाले होते.


मात्र, महेशबाबू यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप नाहीत. ही रोख रक्कम फसवणुकीद्वारे जमा झालेल्या रोख रकमेचा एक भाग असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. भाग्यनगर प्रॉपर्टीज लिमिटेडचे संचालक नरेंद्र सुराणा, साई सूर्या डेव्हलपर्सचे मालक के. सतीश चंद्र गुप्ता आणि इतरांविरुद्ध तेलंगणा पोलिसांनी एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता.




ईडीने १६ एप्रिल रोजी, रिअल इस्टेट गुंतवणूकदारांच्या या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून अनेक ठिकाणी छापे टाकले होते. सुराणा ग्रुप आणि साई सूर्या डेव्हलपर्स यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. सिकंदराबाद, जुबली हिल्स आणि बोवेनपल्ली इथल्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले होते. यावेळी ईडीने सुराणा ग्रुपचे प्रमुख नरेंद्र सुराणा आणि साई सूर्या डेव्हलपर्स यांच्या घरातून कागदपत्रे आणि रोख रकमेच्या स्वरुपात पुरावे जप्त केले आहेत. जप्त केलेल्या कागदपत्रांमधून १०० कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांशी संबंधित मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून येत असल्याचा दावा ईडीने केला आहे. फसवणूक करून मिळवलेले पैसे इतरांकडे वळवण्यात आले होते, ज्यामध्ये जाहिरातींचे ऑफर्स स्वीकारलेल्या सेलिब्रिटींचाही समावेश होता, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. या फसवणुकीने गोळा केलेल्या पैशातून मिळवलेल्या मालमत्ता जप्त करण्याची तयारी ईडी करत आहे.


महेश बाबूला या घोटाळ्याबाबत माहिती नसली किंवा तो या घोटाळ्यात सहभागी नसला तरी त्याला कंपन्यांकडून जाहिरातींसाठी पैसे मिळाले आहेत. त्याच पैशांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने महेश बाबूला समन्स बजावले आहेत. महेश बाबूने अद्याप ईडीने पाठवलेल्या नोटीसीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता अभिनेता यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment