Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाIPL 2025LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर...

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय मिळवला आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये रंगला होता.या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षऱ पटेलने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऋषभ पंतच्या लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने हे आव्हान ८ विकेट्स राहत सहज पूर्ण केले. 

अशी होती दिल्लीची फलंदाजी

१६० धावांचे प्रत्युत्तर देण्यासाटी उतरलेल्या दिल्लीची सुरूवात चांगली राहिली नाही. चौथ्या षटकांत करुण नायरने आपली विकेट गमावली. मार्करमने त्याची विकेट घेतली. यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेलने शानदार फलंदाजी केली. दोघेही चांगल्या लयीमध्ये दिसले. पोरेलने ३२ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. १२व्या षटकांत त्याची विकेट पडली. मात्र एका बाजूला के एल राहुल टिकून होता. त्याने ४० बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. पोरेलची विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अक्षऱनेही तुफानी फलंदाजी केली. याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनऊला ८ विकेटनी हरवले.

अशी होती लखनऊची फलंदाजी

टॉरसनंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या लखनऊची सुरूवात शानदार राहिली. एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी तुफानी सुरूवात केली. दोघांनी शानदार शॉट्स मारले. मार्करमने ३० बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. दोन्ही फलंदाजांनी १० षटकांत ९० धावा ठोकल्या. मात्र मार्करमने आपली विकेट गमावली. त्याने आपल्या खेळीदरम्यान २ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

यानंतर आयपीएललमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा निकोलस पूरन मैदानात पोहोचला. त्याने कुलदीपला चौकारही ठोकला. मात्र १२व्या षटकांत स्टार्कने त्याला बाद केले. पूरनने केवळ ९ धावा केल्या. यानंतर अब्दुल समदही १२ धावा करून बाद झाला. याच षटकांत मुकेश कुमारने मिचेल मार्शलाही बाद केले. मार्शने ४५ धावा केल्या.

पंतला खातेही खोलता आले नाही

एकवेळेस लखनऊचा संघ १० षटकांत एक बाद ९० धावांवर होता. मात्र पुढील १० षटकांत लखनऊ संघाने केवळ ७० धावाच केल्या मात्र ५ विकेट गमावल्या.२७ कोटींना विकत घेतलेला कर्णधार ऋषभ पंत केवळ दोन बॉल खेळण्यासाठी आला. मात्र त्याला खातेही खोलता आले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -