Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला मिळतात. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरात ट्रकच्या धडकेत एस टी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बसच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.



कोल्हापुरातील चंदगडमध्ये बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून ट्रकच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


गेल्या अनेक दिवसापासून बेळगाव वेंगुर्ला रस्ताच्या रुंदीकरण रखडलं आहे. त्यामुळे, येथे अपघाताच्या घटनांचं सत्र दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरुस्तीसह बसच्या मेन्टेनन्स आणि खराब बसच्या वाहतुकीचा मुद्दा समोर आला आहे.

Comments
Add Comment