Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखकाश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप काश्मीरवर प्रलय ओढवत आहे. शनिवारी भूकंपाचा हलका धक्का बसला आणि हे नुकसान कमी होते की काय म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रामबन येथे ढगफुटीने कहर केला. त्यात दोन मुले दगावली. हे नुकसान किरकोळ वाटत असले तरीही त्याची व्याप्ती मोठी आहे आणि हा निसर्गाचा इशारा आहे. पाऊस आणि वादळी वारे यामुळे जीवनाची गती हरवली आणि दुपारचा अंधार भीतीदायक होता असे तेथील वृत्ते सांगतात. वाऱ्याचा वेग अतिशय भयानक होता आणि लोक अक्षरशः दहशतीत होते. हवामानातील बदल हा लोकांसाठी धोक्याचा इशारा होता आणि तो वाटतो त्यापेक्षा जास्त काही तरी त्यात होते. हा इशारा असा आहे की, आम्हाला त्यात यात काहीतरी गंभीर गोष्ट घडली आहे याचा इशारा आहे. आणि याचे परिणाम सतत पृथ्वीवर राहणार आहेत. आणि या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे इथून आम्हाला परवडणार नाही असा गर्भितार्थ त्यात दडला आहे.

ज्या पद्धतीने हवामानाचा हा इशारा काश्मीरच्या जनतेवर परिणाम करत आहे, त्यावरून एक बाब स्पष्ट होते की केवळ त्वरित कृती करणे आवश्यक तर आहेच. पण झाडांच्या फांद्या आणि इलेक्ट्रिक वायर्स यामुळे रहदारीला प्रचंड धोका आहे. संबंधित विभागाने रिस्क ऑडिट म्हणजे धोक्याचे ऑडिट करणे तातडीने करणे गरजेचे आहे. जे अधिकारी याला जबाबदार असतील त्यांना तातडीने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. दुसरे क्षेत्र धोक्याचे आहे, ते म्हणजे सातत्याने होणाऱ्या लँडस्लाईड्स म्हणजे भूस्खलन. या धोक्यापासून तातडीने उपाय शोधण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा धोका कमी करण्याचे उपाय शोधण्याची गरज आहे. ही योजना जितक्या लवकरात लवकर अमलात आणली जाईल तितके ते चांगले आहे. हवामान बदल ही सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत गंभीर असे संकट आहे. यापासून वाचण्यासाठी तातडीने उपाय शोधण्याची गरज आहे. निसर्गाची हानी करण्याचे पाप मानव जातीने केले आहे आणि त्याचे परिमार्जन करण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे पर्यावरणाचा आदर बाळगून निसर्गाची जास्तीत जास्त जपणूक करणे हाच आहे. काश्मीरचे झाले आणि महाराष्ट्राचे येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. येथेही पावसाने हाहाकार पूर्वी माजवला आहे आणि भविष्यात तो माजवणार आहे. यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने तातडीने अगोदरच उपाययोजना करायला हवी. पर्यावरणाचे नुकसान करण्याचे पाप होता कामा नये असे आपण म्हणतो पण तसे प्रत्यक्षात करत नाही. कारण पर्यावरणाचे नुकसान करायचे ते करतोच. त्यामुळे निसर्ग एक दिवस आपल्याला जबरदस्त शिक्षा देतो.

ती मग कधी माळीणची दुर्घटना असो की आणखी कोणती. यात हानी मनुष्याचीच होते आणि निसर्ग आपला रूद्रावतार दाखवून शांत होते. काश्मीरमध्ये जे घडले आहे ते याच प्रकारचे आहे आणि मानवजातीच्या दुर्लक्षाचे फलस्वरूप आहे. काश्मीरमध्ये जे घडले त्याचे वर्णन डेथ, डिस्ट्रक्शन आणि उरलेले डेब्रीस यात करता येईल. तुफानी पाऊस आणि वादळी वारे यामुळे रामबन जिल्ह्यातील डोंगर तसेच त्यांच्या जोडीला भूस्खलन यामुळे विनाशाची अशी लाट आली की क्षणात होत्याचे नव्हते झाले. ४० हून अधिक घरे कोसळली. हा निसर्गाचा इशारा आहे आणि तो जर मानवजातीने समजून घेतला नाही, तर भविष्यातही असेच अनर्थाना समोरे जावे लागणार आहे. तज्ज्ञांनी रामबन जिल्ह्यातील या अनर्थाला कारण येथे सुरू असलेले अव्याहत आणि अवैज्ञानिक उत्खनन आणि जंगले नष्ट होण्याचे प्रकार यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग यावर जंगल सपाटीकरणामुळे हा अनर्थ ओढवला आहे असे लोकांचे म्हणणे आहे. आता यातही विकासाचा कोन आहेच.

जे देशभरात आहे तेच या राज्यातही आहे. येथे विकासाचा समतोल राखण्यासाठी येथे जंगले काही प्रमाणात नष्ट करणे आवश्यक आहेत. पण ते किती प्रमाणात करायची याला काही मर्यादा आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या तरुण असलेले पर्वत भुईसपाट केले जात आहेत आणि त्यामुळे त्यांची पाणी अडवण्याची क्षमता संपुष्टात येते. त्यामुळे सर्वत्र हाच प्रश्न आहे. निसर्ग हवा तर पर्यावरणाला जपले पाहिजे. नियोजन करताना या मुद्याचा बारीकसारीक विचार व्हायला हवा होता. पण राज्यकर्त्यांनी ते केले नाही हे आपण जाणतोच. त्यामुळे मानवजात आज संकटात आहे. आता जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचे संचालक म्हणतात की आम्ही या भागाचे भू-सर्वेक्षण केले होते. पण आज परिणाम आज त्याच्या अगदी उलट आला आहे. ही अशी संकटे नेहमीच येत जाणार आहेत आणि ती महाराष्ट्रात जशी येणार आहेत तशी ती काश्मीरमध्ये येणार आहेत आणि ती उत्तराखंडमध्यही येणार आहेत. हा निसर्गाचा इशारा मानवाने काळजीपूर्वक तपासून त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा काश्मीर ज्याला आपण पृथ्वीवरचे नंदनवन म्हणतो ते एकदिवस उजाड होईल आणि काश्मीरला दहशतवाद्यांनी जसे बरबाद केले तसेच ते आपल्या चुकीमुळे निसर्गही करेल. यावर वेळीच उपायकरण्यात आला पाहिजे. हवामानातील बदलामुळे मानवजातीवर भयानक संकट आले आहे आणि ते तामिळनाडूवर जसे आहे तसेच ते काश्मीरवरही आहे. आणि महाराष्ट्रावरही आहे. त्यामुळे हवामानाचा नवा पॅटर्न लक्षात घेऊन आपण तातडीने पावले उचलावीत हे आपल्या हिताचे आहे. उद्या महाराष्ट्रावरही हीच वेळ येणार आहे. त्यामुळे आज काश्मीर संकटात आहे, तर उद्या आपण तेथेच असू. याचा विचार अगोदरच व्हायला हवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -