मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण काही लोकांना हे माहित नाही आहे कि दह्यासोबत कोणते पदार्थ खावे आणि कोणते नाही. उन्हाळ्यात जेवणासोबत रायता खायला एक वेगळाच आनंद मिळतो. आणि त्याचसोबत शरीरसुद्धा थंड राहते.रायता हा देखील फायदेशीर असतो त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात काही लोक नाश्त्यात पराठ्यासोबत दही खातात. आणि काही लोक दह्याची लस्सी बनवतात आणि पितात.
दह्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डी यासह अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. दह्यासोबत काही गोष्टींचे मिश्रण करू नये. बरेच लोक कांद्याचा रायता बनवतात आणि खातात आणि बरेच लोक कच्च्या कांद्याच्या सॅलडमध्ये दही मिसळून खातात. कच्चा कांदा दह्यासोबत अजिबात खाऊ नका कारण कांद्याचे स्वरूप उष्ण असते आणि रायतेचे स्वरूप थंड असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे, त्वचेची जळजळ आणि ऍलर्जी होऊ शकत.
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ
अनेकदा लोक वजन वाढवण्यासाठी दही आणि केळी एकत्र खातात. बरेच लोक फळांच्या रायत्यामध्ये दही, केळी आणि इतर फळे देखील वापरतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की दह्यासोबत केळी खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला केळी खाल्ल्यानंतर दही खायचे असेल तर ते कमीत कमी २ तासांनी खा.
दूध कधीही दह्यासोबत सेवन करू नये. आयुर्वेदात या दोन्हींचे एकत्र चुकीचे मानले जाते. खरं तर, दही हलके आणि पचायला सोपे असते. तर, दूध जड आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा हे दोन्ही एकत्र सेवन केले जाते तेव्हा दूध दह्याचे पचन मंदावते. यामुळे तुम्हाला गॅस, आम्लता, पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.