Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच अन्य पदार्थांसाठी रेफ्रिजरेटरचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पण, याच्या वाढत्या वापराबरोबरच त्याची योग्य काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी फ्रिज वेळोवेळी साफ करण्याबरोबरच तो कुठे आणि भिंतीच्या किती अंतरावर ठेवायला हवा? हे माहित असणं देखील गरजेचं आहे.
आजच्या काळात प्रत्येकांच्या घरात रेफ्रिजरेटर हा पाहायला मिळतोच. अन्न पदार्थ बराच काळ टिकून राहण्यासाठी तसेच त्यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का, कि रोजच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या या इलेक्ट्रॉनिक उपकरणाची जर योग्य काळजी घेतली नाही, तर त्यामुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते?
आपल्यापैकी ९०% लोकांच्या घरी फ्रिज हा भिंतीला चिकटून असतो. जे योग्य नाही. यामुळे वीज बिल तर वाढतेच पण याबरोबरच फ्रिज गरम होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे रेफ्रिजरेटर भिंतीपासून किती अंतरावर ठेवावा? हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
फ्रिज भिंतीपासून अंतरावर असणे का गरजेच?
फ्रिज जर भिंतीला चिटकून असेल. रेफ्रिजरेटरला आतील भाग थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. या प्रक्रियेदरम्यान मागील ग्रिलमधून उष्णता सोडली जाते. भिंतीला चिटकून ठेवला तर फ्रिज लवकर गरम होतो. त्याची काम करण्याची क्षमताही मंदावते तसेच थंड होण्यासाठी तो जास्त वेळ घेतो ज्यामुळे वीज बिल वाढतं.
फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?
रेफ्रिजरेटर मागील भिंतींपासून आणि, वरच्या कॅबिनेटपासून 1 इंच अंतरावर आणि दोन्ही बाजूंनी किमान 1/4 इंच अंतरावर असायला हवा. रेफ्रिजरेटर भिंतीपासून दूर ठेवण्याव्यतिरिक्त, तोहीटर किंवा इतर उष्णता स्त्रोतापासून देखील दूर ठेवणे महत्वाचे आहे.