Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव...जाणून घ्या या टिप्स

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव...जाणून घ्या या टिप्स
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे. वाढत्या उष्णतेने अनेकांना आरोग्याच्या समस्याही जाणवत आहेत. अशातच नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून आपला बचाव कसा करावा याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.

काय करावे ?


-पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.

-घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.

-दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.

-थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.

- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

-हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

काय करु नये ?


- उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.

- दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.

-दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.

उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.

-लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

-गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

- बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

-उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

-चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.
Comments
Add Comment