Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले 'कमळ'

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले 'कमळ'

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम केलं आहे. नुकत्याच भोर येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अखेर संग्राम थोपटे यांनी आज (दि २२) कमळ हातात घेऊन भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.



भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज (दि २२) त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खा. धनंजय महाडिक, माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत, आ. राहुल कुल, आ. योगेश टिळेकर, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.






यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाला संग्राम थोपटेसारखा कोहीनूर हिरा लाभला आहे अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांचे पक्षात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत, विकसित महाराष्ट्र संकल्पाला साथ देण्यासाठी थोपटे यांनी प्रवेश केल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे मंत्रीपद अनेक वर्षे भूषवलेल्या अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम हे भोर चे तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि अनुभव यामुळे भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचून पुणे जिल्ह्यात भाजपाला बळ मिळेल असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.


दरम्यान, या निर्णयाने संग्राम थोपटे यांच्या निर्णयानंतर पुण्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment