Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीसाहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे त्यांच्या उपस्थितीत आज मालगुंड हे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, कोकणाने महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले, तेवढे कोणत्याच प्रांताने दिले नाहीत. कोकण आणि रत्नागिरी साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले, तर ती खऱ्या अर्थाने केशवसुतांना श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांचे गाव उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात मालगुंडमधील ३०, तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश करण्यात आला आहे. या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत. त्यापैकी दोन दालनांचे आज प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झाले. या दालनांमध्ये पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येणार असून, त्यांच्या आदरातिथ्यातून संबंधित कुटुंबांच्या अर्थार्जनालाही हातभार लागणार आहे.

मालगुंड हे कवितेचे गाव झाल्यामुळे ते जगाच्या नकाशावर येणार आहे, अशी प्रातिनिधिक भावना यावेळी मान्यवरांकडून व्यक्त झाली.

कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकणसाहित्य सन्मान दालनाचे उद्घाटनही या वेळी झाले. समारंभाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कवी अरुण म्हात्रे, नाटककार गंगाराम गवाणकर, मराठी भाषा विकास संस्थेचे डॉ. श्यामकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -