Tuesday, April 22, 2025
HomeदेशPM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना...

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान

नवी दिल्ली : “आपण आज जे निर्णय घेत आहोत, तीच पुढील हजार वर्षांच्या भारताचं भविष्य ठरवतील,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) नागरी सेवकांना देशाच्या परिवर्तनासाठी नवा दृष्टिकोन दिला. नागरी सेवा दिनानिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधानांनी देशाच्या प्रशासनिक यंत्रणेच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं.

पंतप्रधान म्हणाले, “या सहस्रकातील २५ वर्षं उलटली आहेत. आपण आता एका नवीन युगात प्रवेश करत आहोत. आपल्या धोरणांमध्ये दृष्टी, वेग आणि समर्पण असायला हवं. हे धोरण केवळ काळासाठी नव्हे, तर भविष्यासाठी आहे.”

या वेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या ‘भारताची पोलादी चौकट’ या उल्लेखाची आठवण करून देत, संविधानाच्या ७५ व्या वर्षात आणि सरदार पटेलांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवकांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत सेवा द्यावी, असे आवाहन केले.

World Earth Day 2025 : तारीख, थीम, इतिहास, संदेश, विचार, घोषवाक्य आणि भाषण – सगळं एकाच ठिकाणी!

“गती आणि दृष्टिकोन – बदलाच्या मूळ उर्जा”

“गॅजेट्स दर दोन वर्षांनी बदलतात, मुलांचं विचारविश्व वेगाने बदलतं, मग धोरणकर्ते जुन्या साच्यात का राहावेत?” असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधानांनी आधुनिकतेच्या दिशेने प्रशासनाने पुढे जाण्याचा आग्रह धरला. “२०१४ पासून आपण झपाट्याने बदलांचं नेतृत्व करत आहोत. आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. यामुळे आपल्याला असामान्य वेगाने काम करणं गरजेचं आहे.”

स्वच्छ ऊर्जा, अंतराळ क्षेत्रातील कामगिरी, तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट यांचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी नागरी सेवकांना मोठ्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

“सर्वांगीण प्रगती म्हणजे प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ”

यंदाच्या नागरी सेवा दिनाची संकल्पना ‘भारताची सर्वांगीण प्रगती’ असून ती केवळ घोषवाक्य नसून नागरिकांशी केलेली वचनबद्धता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “कोणताही गाव, कुटुंब किंवा नागरिक मागे राहता कामा नये. शिक्षण, आरोग्य, पाणी, डिजिटल अर्थव्यवस्था – ही खरी प्रगती आहे,” असं त्यांनी सांगितलं.

राजकोट, गोमती, तिनसुकिया, कोरापुट, कुपवाडा या जिल्ह्यांतील सौर ऊर्जा, शालेय उपस्थिती यासारख्या प्रगतीचं त्यांनी उदाहरण दिलं. तसेच, आकांक्षी तालुक्यांमधील टोंक, भागलपूर, मारवाह, गुरडीह यासारख्या ठिकाणचं ठोस बदलही अधोरेखित केला.

“हे आकडे नाहीत – ही एका नवभारताची पावलं आहेत!”

शेवटी पंतप्रधानांनी सांगितलं – “शुद्ध हेतू, योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे दुर्गम भागांमध्येही क्रांती घडवता येते.” यंदा नवोन्मेष, आकांक्षी तालुके आणि समग्र विकास श्रेणीत १६ नागरी सेवकांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -